Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी तीन जागांवर ‘यांचा’ उमेदवारी अर्ज
निवडणूक

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी तीन जागांवर ‘यांचा’ उमेदवारी अर्ज

स्थापनेपासून कारखाना दिवंगत नेते माजी आमदार भाऊसाहेब थोरात व त्यांच्यानंतर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली सहकारामध्ये राज्यात दिशादर्शक काम करत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2025Updated:03/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी कारखान्याचे मुख्य मार्गदर्शक असलेले राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

थोरात यांनी गुरुवारी अनुक्रमे जोर्वे, साकुर आणि उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था या तीन गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे. पहिल्याच दिवशी माजी मंत्री थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कारखाना निवडणुकीने पहिल्याच दिवशी वेग पकडला आहे. विरोधकांनी कारखाना निवडणुकीसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली असून यावेळी निवडणूक रंगण्याची चिन्हे आहे.

स्थापनेपासून कारखाना दिवंगत नेते माजी आमदार स्वातंत्र्यसैनिक, भाऊसाहेब थोरात व त्यांच्यानंतर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली सहकारामध्ये राज्यात दिशादर्शक काम करत आहे. सातत्याने दिलेला उच्च भाव आणि शेतकरी समोर ठेवून घेतलेले लोकाभिमुख निर्णय यामुळे कारखान्याने आत्तापर्यंत राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळविले आहेत.

येत्या ११ मे रोजी थोरात सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.

कारखाना निवडणुकीत थोरात गटाकडून यावेळी कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता असून विधानसभेतील पराभवानंतर थोरात प्रथमताच कारखान्यात देखील भाकरी फिरविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे थोरात यांच्या नेतृत्वासमोर टिकणारे उमेदवार उभे देणे विरोधकांसाठी सध्या तरी आव्हान बनले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. सध्या तरी थोरात यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविले असल्याचे दिसत असून त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,040
उमेदवारी अर्ज थोरात कारखाना निवडणूक बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दुष्काळाच्या तीव्र संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती…

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.