Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार खताळ यांनी केली पाहणी, तातडीने पंचनामा करण्याचे दिले आदेश
राजकारण

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार खताळ यांनी केली पाहणी, तातडीने पंचनामा करण्याचे दिले आदेश

त्यांनी सावरगाव तळ, धांदरफळ, मिर्झापूर, नांदुरी दुमाला, कौठे धांदरफळ, नांदूर खंदरमाळ आणि जांबुत या गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी

बुधवारी संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी सावरगाव तळ, धांदरफळ, मिर्झापूर, नांदुरी दुमाला, कौठे धांदरफळ, नांदूर खंदरमाळ आणि जांबुत या गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.

कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाई दगावल्या होत्या, या ठिकाणी आमदार खताळ यांनी भेट देऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच, शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नांदुरी दुमाला येथे जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळली होती. या ठिकाणाचीही त्यांनी पाहणी केली.

या दौऱ्यात आमदार खताळ यांनी कांदा, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, सिमला मिरची, ऊस, गहू आणि बाजरी या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात आमदार अमोल खताळ यांच्यासोबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार सुभाष कदम, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, मंडलाधिकारी, कामगार तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 848
अमोल खताळ अवकाळी पाऊस नुकसान पाहणी दौरा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.