Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी होणार; धर्मादाय सहआयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन
आरोग्य

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी होणार; धर्मादाय सहआयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी आरोप केला आहे की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे केवळ धनदांडग्यांचे रुग्णालय बनले आहे. सामान्य माणसांना तिथे उपचार मिळत नाहीत. काल तनिषा भिसे नावाच्या गरोदर महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आणि त्यांची मुले पोरकी झाली. याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. ४ एप्रिल – विशेष प्रतिनिधी

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून एका गर्भवती महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याच्या गंभीर आरोपांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयातून दूरध्वनी करूनही रुग्णालयाने महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या चौकशी समितीत उपसचिव यमुना जाधव (मुख्यमंत्री सचिवालय प्रतिनिधी), सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी (धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष), सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील. तसेच, विधि आणि न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धर्मादाय रुग्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यापूर्वीच जारी करण्यात आल्या आहेत. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यासाठी प्रधान सचिव (विधि आणि न्याय विभाग) आणि धर्मादाय आयुक्त यांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. धर्मादाय रुग्णालयातील राखीव खाटा गरीब आणि दुर्बळ घटकांतील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी तातडीने ऑनलाईन प्रणालीद्वारे ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची’ मान्यता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील या कथित घटनेबद्दल राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. संभाजी ब्रिगेडने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा धर्मादाय परवाना रद्द करण्याची आणि हॉस्पिटलसाठी दिलेली जमीन सरकारने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी आरोप केला आहे की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे केवळ धनदांडग्यांचे रुग्णालय बनले आहे. सामान्य माणसांना तिथे उपचार मिळत नाहीत. काल तनिषा भिसे नावाच्या गरोदर महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आणि त्यांची मुले पोरकी झाली. याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र सरकारने रुग्णालय प्रमुख, डॉक्टर आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 734
चौकशी समिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालय देवेंद्र फडणवीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला; ‘नार्को टेस्ट’चे दिले आव्हान, शेतकरी कर्जमाफीची घोषणाही ठरवली फसवी

10/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.