Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाचखोर महिला पोलीस कर्मचारी एसीबीच्या कचाट्यात, पळून जाताना झाली अटक!
गुन्हेगारी

लाचखोर महिला पोलीस कर्मचारी एसीबीच्या कचाट्यात, पळून जाताना झाली अटक!

खटला न्यायालयात न पाठवण्यासाठी आणि कोणताही दंड न आकारण्यासाठी पोलीस शिपाई नाईकरे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला दोन हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती एक हजार रुपये लाच घेण्यास त्या तयार झाल्या.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 6, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे, दि. ६ एप्रिल – 

लाचेची रक्कम स्वीकारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (५ एप्रिल) पिंपरी न्यायालयाच्या बाहेर करण्यात आली.

रेश्मा बाळू नाईकरे (वय ३२) असे लाच घेणाऱ्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. त्या भोसरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या प्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारदाराच्या माहितीनुसार, त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे आणि त्यांची डेअरी रात्री उशिरापर्यंत सुरू राहत होती. त्यामुळे भोसरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. हा खटला न्यायालयात न पाठवण्यासाठी आणि कोणताही दंड न आकारण्यासाठी पोलीस शिपाई नाईकरे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला दोन हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती एक हजार रुपये लाच घेण्यास त्या तयार झाल्या.

शनिवारी, नाईकरे यांनी भोसरी पोलीस ठाण्याच्या परिसरात तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. रक्कम घेतल्यानंतर त्या पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच, एसीबीच्या पथकाने पिंपरी न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर त्यांना पकडले. या कारवाईनंतर पोलीस शिपाई रेश्मा नाईकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्यांनी तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा.

ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पुणे विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे, विजय चौधरी, उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भोसले, पोलीस अंमलदार कोमल शेटे, अश्विन कुमकर, दीपक काकडे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,560
महिला पोलीस लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगणाऱ्या…

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.