Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जेसीबी चालकाचा हात, पाय आणि मुंडक्याविना मृतदेह; अवयवांच्या शोधासाठी ड्रोनची मदत हत्येचा संशय, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

जेसीबी चालकाचा हात, पाय आणि मुंडक्याविना मृतदेह; अवयवांच्या शोधासाठी ड्रोनची मदत हत्येचा संशय, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

सीताराम यांचा मृतदेह हात, पाय आणि मुंडक्याशिवाय आढळल्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. हे अवयव कापले गेले आहेत की एखाद्या हिंस्र प्राण्याने खाल्ले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/04/2025Updated:08/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे, दि. ७ एप्रिल
पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिघी पोलिसांनी मोशीतील एका दगडाच्या खाणीत एका व्यक्तीचा हात, पाय आणि मुंडक नसलेला मृतदेह शोधून काढला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मृतदेहाची ओळख पटली असून सीताराम ढाले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते जेसीबी चालक होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीताराम ढाले २९ मार्च रोजी घरातून कामासाठी निघाले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते मोशीतील दगडाच्या खाणीच्या दिशेने जाताना दिसले होते. मात्र, ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने ३१ मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
तीन दिवसांनंतर, मोशी येथील सुमारे १०० फूट खोल असलेल्या दगडाच्या खाणीत एका व्यक्तीचा धड सापडला, ज्याला हात, पाय आणि मुंडके नव्हते. दिघी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यांनी तात्काळ याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यांना दिली. त्यानंतर, भोसरी पोलिसांनी बेपत्ता असलेल्या सीताराम यांच्या पत्नी आणि नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले.
घटनास्थळावर सापडलेला मोबाईल फोन आणि कपड्यांवरून मृतदेहाची ओळख सीताराम ढाले म्हणून झाली. प्राथमिक तपासात हा खून असल्याचा संशय पोलिसांना आला आणि ४ एप्रिल रोजी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सीताराम यांचा मृतदेह हात, पाय आणि मुंडक्याशिवाय आढळल्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. हे अवयव कापले गेले आहेत की एखाद्या हिंस्र प्राण्याने खाल्ले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दिघी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. गायब झालेले अवयव शोधण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली, परंतु ते अद्याप सापडलेले नाहीत.
सीताराम यांचे कोणाशीही वाद किंवा वैर नव्हते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या, किंवा ते चुकून खाणीत पडले, या सर्व शक्यतांचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,649
गुन्हेगारी हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

By Annant Ppangarkar18/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या…

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.