Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नांदुरी दुमाला व मिर्झापूरमध्ये गारपिटीने झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; तातडीने मदतीचे आश्वासन
प्रशासन

नांदुरी दुमाला व मिर्झापूरमध्ये गारपिटीने झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; तातडीने मदतीचे आश्वासन

यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने साहेबराव वलवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की, पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यास मोठी दिरंगाई होते आणि शासनाची मदत नुकसानीच्या तुलनेत खूप कमी असते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. तरी शासनाने भरीव आणि तातडीने नुकसान भरपाई द्यावी.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १० एप्रिल प्रतिनिधी – 

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला आणि मिर्झापूर या गावांतील गारपिटीने बाधित झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. टोमॅटो उत्पादक गणेश वलवे आणि ऊस उत्पादक व भाजपचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष साहेबराव अशोकराव वलवे यांनी त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे अचूक पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी समन्वय साधून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी माहिती देताना सांगितले की, ९९ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून त्यांच्या याद्या ग्रामपंचायत आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे चुकून राहिले असतील, त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये नावे नोंदवावीत, त्यांचे पंचनामे उद्या तातडीने पूर्ण केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात तहसीलदार धीरज मांजरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष साहेबराव वलवे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामभाऊ राहणे, सर्कल ससे मॅडम, तलाठी योगिता वाळुंज, कृषी सहाय्यक मोरे मॅडम, शेलार, गणेश वलवे, भाऊसाहेब भालके, सदू शिरतार, अशोक वलवे, विश्वनाथ वलवे, विकास वलवे, प्रशांत फटांगरे, भाऊसाहेब घोडे, संतोष डोंगरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने साहेबराव वलवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की, पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यास मोठी दिरंगाई होते आणि शासनाची मदत नुकसानीच्या तुलनेत खूप कमी असते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. तरी शासनाने भरीव आणि तातडीने नुकसान भरपाई द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेतली असून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,240
पंकज आशिया पाहणी दौरा शैलेश हिंगे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी पोलीस…

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.