Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिवंत सातबारा योजनेचा लाभ घ्या! वारस नोंदी सुलभ करण्याची शासनाची मोहीम – आ. अमोल खताळ यांचे आवाहन
राजकारण

जिवंत सातबारा योजनेचा लाभ घ्या! वारस नोंदी सुलभ करण्याची शासनाची मोहीम – आ. अमोल खताळ यांचे आवाहन

अर्ज करताना मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र, पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक) आणि रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दिनांक १० एप्रिल – प्रतिनिधी

शेतीच्या मालकी हक्कात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि वारसांच्या नोंदी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे सातबारा उताऱ्यावरील मयत खातेदारांची नावे कमी होणार असून, वारसांच्या नोंदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वारस नोंदीची प्रकरणे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होऊन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील अडचणी दूर होतील. तसेच, वारसांना शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे जाईल आणि त्यांच्यातील मालकी हक्कासंबंधीचे वाद टळतील, असेही त्यांनी सांगितले.

या योजनेच्या वेळापत्रकानुसार, १ ते ५ एप्रिल दरम्यान तलाठ्यांनी मृत खातेदारांची यादी तयार करून त्याचे चावडी वाचन केले आहे. आता ६ ते २० एप्रिल या कालावधीत वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी आहे. त्यानंतर २१ एप्रिल ते १० मे दरम्यान ई-फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाईल.

अर्ज करताना मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र, पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक) आणि रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असून कोणत्याही मध्यस्थ किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नयेत, असे आवाहन महसूल विभागाने केले असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या वारस नोंदी अद्ययावत कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,502
अमोल खताळ चंद्रशेखर बावनकुळे जिवंत सातबारा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.