Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचाराच्या आरोपातून युवकाची निर्दोष मुक्तता; संगमनेर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
आंदोलन

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचाराच्या आरोपातून युवकाची निर्दोष मुक्तता; संगमनेर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

अवघ्या सहा महिन्यात या खटल्याचा न्यायालयाने निर्णय दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/08/2026Updated:06/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

अकोले तालुक्यातील एका गंभीर प्रकरणात संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी (५ ऑगस्ट) आरोपी युवकाची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. किरण किसन सावंत असे मुक्तता करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून अवघ्या सहा महिन्यात या खटल्याचा न्यायालयाने निर्णय दिला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा ठपका ठेवत अकोले पोलीस ठाण्यात किरण किसन सावंत या १९ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, १० डिसेंबर २०२५ रोजी अकोले तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. मुलीच्या आईने सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाची फिर्याद दिली होती. पोलीस तपासादरम्यान संशयित किरण सावंत या युवकाला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाअंती आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांन्वये न्यायालयात ५ फेब्रुवारीला दोषारोपपत्र दाखल केले होते.

मात्र, न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. या खटल्यातील मुख्य साक्षीदार असलेली पीडित मुलगी आणि तिची आई न्यायालयात आपल्या जबाबापासून फिरल्या. साक्षीच्या वेळी त्यांनी आरोपीविरोधातील आरोपांना कोणताही दुजोरा दिला नाही. तसेच त्यांनी न्यायालयात आरोपीची ओळख पटवण्यास स्पष्ट नकार दिला आणि अपहरणाचा अथवा अत्याचाराचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे न्यायालयात सांगितले. मुख्य साक्षीदारच फितूर झाल्यामुळे सरकारी पक्षाला आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध करता आले नाहीत.

या प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सीमा काळे-सातपुते यांनी काम पाहिले. आरोपी आणि सरकार पक्षाच्या बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे विचारात घेत न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी सबळ पुराव्यांअभावी आरोपी किरण सावंत याची सर्व आरोपांतून मुक्तता केली, या खटल्याकडे लक्ष लागले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,220
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.