Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा: जलसाक्षरता आणि पाणी बचतीवर भर
महाराष्ट्र संवाद विशेष

अहिल्यानगर जिल्ह्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा: जलसाक्षरता आणि पाणी बचतीवर भर

जलसाक्षरता वाढवण्यासाठी १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान 'जलव्यवस्थापन कृती पंधरवडा' आयोजित करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. १४ प्रतिनिधी – 

जिल्ह्यातील नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देण्यासोबतच जलसाक्षरता वाढवण्यासाठी १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या पंधरवड्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

या जलसंपदा पंधरवड्याचा शुभारंभ १५ एप्रिल २०२५ रोजी होईल. त्यानंतर १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, १७ एप्रिल रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अभियान आणि जल पुनर्भरण यावर भर दिला जाईल. १८ एप्रिल रोजी शेतकरी आणि पाणी वापर संस्था यांच्यात संवाद साधला जाईल, तर १९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन संबंधित अडचणींचे निराकरण आणि कालव्यांची संयुक्त पाहणी केली जाईल. २० एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

उपसा सिंचनासाठी पाण्याच्या परवानग्यांसंबंधी तक्रारींचे निवारण २१ एप्रिल रोजी केले जाईल. २२ एप्रिल रोजी अनधिकृतपणे होणारा वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा शोधून त्यावर कारवाई करण्यात येईल. २३ एप्रिल रोजी जलसंपदा आणि कृषी विभाग संयुक्तपणे पीक पद्धती बदल, उत्पादकता वाढ आणि पाण्याचे नियोजन यावर बैठका व कार्यशाळा आयोजित करतील.

सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली आणि थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा २४ एप्रिल रोजी घेतला जाईल. २५ एप्रिल रोजी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे (KVK) आणि सेवाभावी संस्था यांच्यासोबत संवाद व कृती कार्यक्रम आयोजित केले जातील. २६ एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष पाणी वापराचे परीक्षण आणि पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाणी प्रकरणांचा शोध घेतला जाईल. २७ एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन (पूर आणि मालमत्तेचे संरक्षण) केले जाईल.

महसूल विभागाच्या समन्वयाने २८ एप्रिल रोजी महामंडळाच्या नावावर संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेणे आणि ३१ मे पूर्वी अतिक्रमण निष्कासन करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. २९ एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र व कार्यशाळा होतील आणि ३० एप्रिल २०२५ रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयात कार्यशाळा, महिला मेळावा आणि समारोप कार्यक्रम आयोजित केला जाईल.

या पंधरवड्यात नागरिकांना जल बचतीचे महत्त्व पटवून देण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने कळवले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 458
जलसाक्षरता अभियान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित गंभीर समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील…

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.