Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ! नवी आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे करणार
राजकारण

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ! नवी आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे करणार

राज्यातील तीन प्रमुख नेते - राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर - यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, या तिन्ही नेत्यांनी येत्या रविवारी पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ चे आयोजन केले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अस्थिर असलेल्या राजकीय वातावरणात आता आणखी एक नवी आघाडी उदयास येण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी पक्षांविरोधात विरोधकांची धार कमी होत असतानाच, राज्यातील तीन प्रमुख नेते – राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर – यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, या तिन्ही नेत्यांनी येत्या रविवारी पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ चे आयोजन केले आहे.

या परिषदेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना, बच्चू कडू यांचा ग्रामीण भागातील प्रभाव आणि महादेव जानकर यांचा ओबीसी मतदारांवरील जनाधार एकत्र येणार आहे. “खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार!” या टॅगलाइनखाली होणाऱ्या या परिषदेत हे तिन्ही नेते सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकणार आहेत. यामुळे राज्यातील राजकारणाला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर महायुतीने मोठे यश संपादन केले. तर, महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा), शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्रितपणे ५० आमदारांचा आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे विरोधकांची भूमिका काहीशी कमजोर झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर, या तीन मोठ्या नेत्यांची एकत्र येण्याची खेळी सत्ताधारी पक्षांसमोर एक नवीन आणि मोठे आव्हान उभे करू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता या नव्या आघाडीची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 803
बच्चू कडू महादेव जानकर राजकारण राजू शेट्टी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.