Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा तोडण्यास सुरुवात, दगडफेक आणि तोडफोडीमुळे तणाव
महाराष्ट्र संवाद विशेष

नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा तोडण्यास सुरुवात, दगडफेक आणि तोडफोडीमुळे तणाव

नाशिक महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार या अनधिकृत दर्ग्याला १ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – नाशिक
शहरातील काठे गल्ली परिसरात असलेल्या एका अनधिकृत दर्ग्याच्या उर्वरित बांधकामावर आज पहाटेपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, यात तीन ते चार पोलीस जखमी झाले असून पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अनधिकृत दर्गा ट्रस्टला आपले म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत आज, १५ एप्रिल रोजी संपली. यानंतर नाशिक महानगरपालिकेने (NMC) मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून उर्वरित बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. यापूर्वी याच दर्ग्यावर कारवाई करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अतिरिक्त कुमक मागवली आहे.
कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी १०० मीटरच्या परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले असून कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही. प्रशासनाकडून आज दुपारपर्यंत हे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे हटवले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, तोडक कारवाई सुरू होण्यापूर्वी रात्रीच्या वेळी काठे गल्ली परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काही जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत पसरलेल्या अफवांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
नाशिक महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार या अनधिकृत दर्ग्याला १ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. स्वतःहून बांधकाम हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते, अन्यथा तोडक कारवाईचा इशारा दिला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गातही बदल केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,144
काटे गल्ली दर्गा महानगरपालिका पोलीस कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.