Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. जगन्नाथ वामन, उपाध्यक्षपदी ॲड. प्रसाद भडांगे तर महिला उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता सस्कर यांची फेरनिवड; जुन्या कार्यकारिणीलाच पुन्हा संधी
निवडणूक

संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. जगन्नाथ वामन, उपाध्यक्षपदी ॲड. प्रसाद भडांगे तर महिला उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता सस्कर यांची फेरनिवड; जुन्या कार्यकारिणीलाच पुन्हा संधी

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात वकील संघाच्या हितासाठी आणि न्यायव्यवस्थेच्या संवर्धनासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/04/2025Updated:16/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी विधिज्ञ ॲड. जगन्नाथ वामन, उपाध्यक्षपदी ॲड. प्रसाद भडांगे, महिला उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता सस्कर यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीची पुन्हा फेरनिवड करण्यात आले आहे.

१५ एप्रिल, २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वकील संघाचे कार्यकारिणी निवडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये निवडणूक कार्यक्रम न लावता सद्यस्थितीत काम करणाऱ्या, गेल्या वर्षभरात वकिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच वकिलांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची दखल घेत कार्यकारिणीलाच सन २०२५ ते २०२६ या वर्षांच्या कालावधीसाठी संधी देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. त्यामुळे जुन्याच कार्यकारिणीकडे नव्या वर्षासाठी ची सूत्रे सोपविण्यात आली.

अध्यक्षपदासाठी ॲड. वामन, उपाध्यक्षपदी भडांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल, तर महिला उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता सस्कर यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीची फेरनिवड झाली. यात खजिनदारपदी ॲड. बबन नाईकवाडी, सचिवपदी ॲड. योगेश गुंजाळ तर, सदस्य म्हणून ॲड. स्वाती सांगळे, ॲड. अबरार देशमुख, ॲड. सचिन व्यवहारे, ॲड. किरण भोकनळ, ॲड. रवी वर्पे, ॲड. शिवाजीराव काकड यांचा देखील फेर निवड झालेल्यांमध्ये समावेश आहे.

कार्यकारिणीने केलेल्या उत्कृष्ट कामामुळे आणि सदस्यांच्या एकमतामुळे नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात वकील संघाच्या हितासाठी आणि न्यायव्यवस्थेच्या संवर्धनासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ॲड. जगन्नाथ वामन, प्रसाद भडांगे यांनी आपल्या निवडीनंतर सर्व सदस्यांचे आभार मानले आणि आगामी काळात संघाच्या विकासासाठी आणि वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. महिला उपाध्यक्ष ॲड. स्मिता सस्कर यांनी महिला वकिलांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची ग्वाही दिली.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे संगमनेर तालुका वकील संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी काळात ही नवी कार्यकारिणी वकील आणि न्यायपालिका यांच्यातील समन्वय अधिक दृढ करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 8,675
जगन्नाथ वामन प्रसाद भडांगे संगमनेर बार असोसिएशन स्मिता सस्कर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली…

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.