Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात, संगमनेर तालुक्यातील प्रकार
गुन्हेगारी

५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात, संगमनेर तालुक्यातील प्रकार

ही यशस्वी सापळा कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक योगेश साळवे आणि पोलीस नाईक परशुराम जाधव यांच्या पथकाने पार पाडली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 17, 2025Updated:April 17, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील तलाठी अक्षय ढोबळे आणि खासगी व्यक्ती पत्रकार रमजान नजीर शेख हे ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. या प्रकाराने संगमनेरमध्ये खळबळ उडाली असून एसीबीच्या जाळ्यात सापडलेला शेख नेमका कशाचा पत्रकार आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.
खडी वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी आणि ती सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ व १२ प्रमाणे घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या नाशिक युनिटने आणि घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा ट्रकद्वारे खडी वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. त्यांची वाहतूक सुरळीत सुरू राहावी आणि त्यांच्या ट्रकवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी आरोपी रमजान नजीर शेख (वय २८, व्यवसाय पत्रकारिता व शेती, रा. मांडवे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याने तलाठी अक्षय ढोबळे यांच्या सांगण्यावरून १६ एप्रिल २०२५ रोजी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने यानंतर तलाठी अक्षय ढोबळे यांची रमजान शेख याच्या समक्ष भेट घेत खडी ट्रक वाहतुकीबाबत चर्चा केली. त्यावर तक्रारदाराने दोघांना ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यांनी आपल्या खडी वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई करू नये आणि ती सुरळीत चालू ठेवावी, अशी विनंती केली. यावर तलाठी अक्षय ढोबळे यांनी पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शवली, परंतु या बदल्यात गाड्या फक्त दोन महिनेच चालतील, असे सांगितले.
योजनेनुसार, १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८:३९ वाजता मांडवे येथील मारुती मंदिरासमोर आरोपी पत्रकार रमजान नजीर शेख याने पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारण्याबाबत रमजान शेख याने तलाठी अक्षय ढोबळे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली आणि काय करावे, असे विचारले. त्यावर ढोबळे यांनी ‘ठीक आहे, उद्या बघू’ असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शवली.
या सापळा कारवाईत एसीबीच्या पथकाने आरोपी पत्रकार असलेल्या रमजान शेख याला ताब्यात घेतले आहे. तर, तलाठी अक्षय ढोबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तलाठी फरार झाल्याची माहिती समोर येत आहे.

ही यशस्वी सापळा कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक योगेश साळवे आणि पोलीस नाईक परशुराम जाधव यांच्या पथकाने पार पाडली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 3,322
अक्षय ढोबळे नाशिक युनिट रमजान शेख लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By अनंत पांगारकरJune 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून…

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.