
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
येथील डॉ. सौरभ श्रीकृष्ण गिते यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या MD (आयुर्वेद) या पदव्युत्तर परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
डॉ. सौरभ हे विधिज्ञ श्रीकृष्ण चांगदेव गिते आणि माणिक श्रीकृष्ण गिते यांचे सुपुत्र आहेत. तसेच, ते डॉ. सुशांत गिते यांचे बंधू आहेत. त्यांनी आपले बीएएमएस (BAMS) आणि एमडी (MD) पर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथील यशवंत आयुर्वेद महाविद्यालयातून पूर्ण केले. यापूर्वी, त्यांनी संगमनेरच्या दिगंबर गणेश सराफ विद्यालयात शालेय शिक्षण आणि सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे.

डॉ. सौरभ यांच्या या यशाबद्दल त्यांचे वडील श्रीकृष्ण, आई माणिक, पत्नी डॉ. मयुरी, बंधू डॉ. सुशांत आणि डॉ. सोनाली गिते यांच्यासह डॉ. विष्णुपंत भंडारे, डॉ. स्मिता भंडारे, उदयकुमार खैरनार, मोहिनी खैरनार, डॉ. निलेश सातपुते, डॉ. अमोल वालझाडे, डॉ. विकास करंजेकर, डॉ. सोमनाथ मुटकुळे, डॉ. विनायक नागरे, डॉ. शरद गुंजाळ, डॉ. संदीप वामन आणि इतर अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, डॉ. सौरभ गिते आणि त्यांच्या पत्नी डॉ. मयुरी यांचे ‘साईश्रद्धा चौक, घुलेवाडी रोड, संगमनेर’ येथे संयुक्त क्लिनिक कार्यरत आहे. या माध्यमातून ते स्थानिक नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहे. डॉ. सौरभ गिते यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


