Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात तरुणावर प्राणघातक हल्ला; डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न, परिसरात दहशतीचे वातावरण
गुन्हेगारी

संगमनेरात तरुणावर प्राणघातक हल्ला; डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न, परिसरात दहशतीचे वातावरण

अकोले नाका परिसरात या मारहाण करणाऱ्यांची मोठी दहशत आहे. त्यांच्या या गुंडगिरीमुळे परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने तत्काळ बंद करून घेतली, तर रस्त्याने ये-जा करणारे नागरिक त्यांना पाहून सैरावैरा पळत होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

शहरातील अकोले नाका परिसरात शनिवारी (दि. १९) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका तरुणावर चार जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला चढवला. नीलेश सोमनाथ मंडलिक (वय ३६, रा. ढोलेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण करत डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनिकेत मंडलिक (रा. माळीवाडा, संगमनेर), साई सूर्यवंशी, अक्षय चव्हाण (दोघेही रा. अकोले नाका) आणि एका अनोळखी व्यक्ती अशा चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन भाऊसाहेब नाईक (वय ३८, रा. कासारा दुमाला, संगमनेर) यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. जखमी नीलेश मंडलिक हे फिर्यादी सचिन नाईक यांचे मामाचे मुलगे आहेत. तक्रारीत नमूद केल्यानुसार, नीलेश मंडलिक यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ही मारहाण करण्यात आली.

नीलेश मंडलिक यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी दगडाने नीलेश यांच्या डोक्यात गंभीर वार केले. मारहाणीच्या वेळी नीलेश यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. रस्त्याने ये-जा करणारे लोक आणि परिसरातील दुकानदारांकडे त्यांनी मदतीची याचना केली. मात्र, हल्लेखोरांनी मदतीसाठी धावून येणाऱ्या लोकांना ‘कोणी मध्ये पडला तर त्याला आम्ही मारून टाकू’ अशी धमकी दिली. यामुळे कोणीही मदतीसाठी पुढे येण्याचे धाडस केले नाही.

अकोले नाका परिसरात या मारहाण करणाऱ्यांची मोठी दहशत आहे. त्यांच्या या गुंडगिरीमुळे परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने तत्काळ बंद करून घेतली, तर रस्त्याने ये-जा करणारे नागरिक त्यांना पाहून सैरावैरा पळत होते. या घटनेमुळे परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

गंभीर जखमी नीलेश मंडलिक यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. संगमनेर शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. या घटनेमुळे संगमनेर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,647
गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – कर्जत येथील सोनारगल्लीतील ‘ओम ज्वेलर्स’ हे दुकान फोडून…

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.