Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये गोवंश हत्या प्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये गोवंश हत्या प्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल

आरोपी अदनान इक्बाल कुरेशी (वय १९) याने हे कृत्य केले असल्याचे समोर आले. त्याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 23, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

आज (बुधवारी, २३ एप्रिल) पहाटे पाच वाजता संगमनेरच्या भारत नगरमधील कादरी मस्जिदच्या मागील बाजूस गल्ली नंबर १ येथे एका वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

संगमनेर मध्ये पोलिसांकडून सातत्याने कत्तलखाना चालकांवर कारवाया केल्या जात आहे. संगमनेर शहर पोलीस, पोलीस उपअधीक्षक आणि अहिल्यानगर च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून संगमनेर मधील कत्तलखान्यांवर सातत्याने छापेमारी केली जात आहे. यातून वारंवार या अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखान्यांमध्ये गोवंश जनावरांची हत्या होत असल्याचे समोर आले आहे. या शिवाय वारंवार तेच तेच आरोपी निष्पन्न होत आहेत. संगमनेर चे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात काही कत्तलखाने उद्ध्वस्त केले. मात्र अद्यापही संगमनेर मध्ये गोवंश जनावरांच्या कत्तली सुरूच आहे. याप्रकरणी आमदार खताळ काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

कारवाई पूर्वी एका वाड्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी छापा टाकला. कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकाला घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ३,६०,०००/- रुपये किंमतीचे १२०० किलो गोमांस आणि कत्तल करण्यासाठी वापरलेला एक सुरा जप्त केला आहे.

आरोपी अदनान इक्बाल कुरेशी (वय १९) याने हे कृत्य केले असल्याचे समोर आले. त्याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई रोहिदास शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक – ३४०/२०२५, बीएनएस कलम २७१, ३२५ सह महाराष्ट्र पशुसंरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ (क), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव हे करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,218
कत्तलखाना कारवाई कत्तलखाना छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: संगमनेर शहरात अवैध गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगणाऱ्या…

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.