Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात संगमनेरात माकपचे विराट शक्तिप्रदर्शन; हजारो श्रमिकांचा सहभाग
आंदोलन

जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात संगमनेरात माकपचे विराट शक्तिप्रदर्शन; हजारो श्रमिकांचा सहभाग

सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला राज्य सरकार बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई करू शकणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/04/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

व्यक्ती आणि संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचे अमर्याद अधिकार राज्य सरकारला देणाऱ्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) काल (मंगळवार,२२ एप्रिल) संगमनेरमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केले. अकोले आणि संगमनेर तालुक्यातील हजारो श्रमिक या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले आणि त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला.

राज्य सरकार शहरी नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात सरकारच्या धोरणांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या आणि आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर कारवाई करण्याचे प्रचंड अधिकार या विधेयकामुळे सरकारला मिळणार आहेत. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला राज्य सरकार बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई करू शकणार आहे.

या विधेयकांतर्गत दोषी आढळलेल्या व्यक्तीस दोन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा आणि त्यांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे अमर्याद अधिकार सरकारला मिळतील. यामुळे सरकारी धोरणे आणि निर्णयांवर कोणत्याही प्रकारचे मतप्रदर्शन करणे किंवा त्यांची चिकित्सा करणे पूर्णपणे अशक्य होणार आहे. केवळ राजकीय पक्ष किंवा संघटनाच नव्हे, तर पत्रकार, विचारवंत, कवी, लेखक, युट्युब चॅनेलचे चालक, अशा कुणालाही सरकारच्या धोरणांवर आपले मत व्यक्त करता येणार नाही.

सरकारला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर या कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. हे विधेयक संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारांवर थेट हल्ला असून, ते सर्व प्रकारच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारे आहे, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी आणि समविचारी संघटनांनी या विधेयकाविरोधात राज्यभर जोरदार आंदोलने केली आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्यातील पत्रकारांनीही सरकारला या विधेयकाकडे लक्ष वेधून ते मागे घेण्याची मागणी केली होती.

संगमनेर शहरातील स्वातंत्र्य चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाजवळ अकोले आणि संगमनेर तालुक्यातील हजारो श्रमिक एकत्र आले. संगमनेर शहरातील पुरोगामी विचारांच्या संघटनांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य चौकातून एका विशाल मोर्चाला सुरुवात झाली. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकला. येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना वक्त्यांनी राज्य सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली.

डॉ. अजित नवले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “एकीकडे हे सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार, आशा सेविका, अंगणवाडी ताई, बांधकाम कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी, युवक, विद्यार्थी आणि महिला अशा सामान्य जनतेवर आपल्या धोरणांच्या माध्यमातून हल्ले करत आहे. त्यांच्या धोरणांमुळे या श्रमिकांचे जगणे मुश्किल झाले आहे आणि दुसरीकडे याच अन्यायकारक धोरणांविरुद्ध जनतेने आवाज उठवू नये म्हणून जनसुरक्षासारखी विधेयके आणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारची ही कृती पूर्णपणे संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी आहे. महाराष्ट्रातील जनता ही दादागिरी कदापि सहन करणार नाही.”

या मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी कॉ. सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ताराचंद विघे, नंदू गवांदे, नशीब वरपे, वसंत वाघ, हेमलता शेळके, गणेश ताजने, संगीत साळवे, रंजना पराड, अनिता साबळे, निर्मला मांगे, नंदा म्हसे, द्रौपदा रावते, प्रकाश साबळे, शिवराम लहामटे, मथुराबाई बर्डे, आशा घोलप, अविनाश धुमाळ, लक्ष्मण घोडे, सुनील बांडे, काळू मेंगाळ आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 860
अजित नवले माकप मोर्चा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित गंभीर समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील…

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.