Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये महायुतीचा पाकिस्तान विरोधात संताप, पाकिस्तानी झेंड्याचे दहन
आंदोलन

संगमनेरमध्ये महायुतीचा पाकिस्तान विरोधात संताप, पाकिस्तानी झेंड्याचे दहन

पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला मागील सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठी कारवाई करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मागणी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. बसस्थानकासमोर जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि पाकिस्तानच्या हिरव्या झेंड्याचे दहन करून आपला संताप व्यक्त केला.

यावेळी महायुतीच्यावतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निदर्शनांमध्ये शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे तालुका आणि शहर स्तरावरील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महायुतीच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, दहशतवाद्यांना कठोर शासन करावे आणि त्यांच्या संघटनांना संपवण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत. हिंदू पर्यटकांवरील हा हल्ला केवळ एका विशिष्ट समुदायावर नसून संपूर्ण देशावरील हल्ला असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्यांची जबर किंमत चुकवावी लागेल, असा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला मागील सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठी कारवाई करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मागणी केली.

यावेळी भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे, तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी व दिनेश फटांगरे, तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कैलास कासार, भाजपचे दिनेश सोमाणी, राम जाजू, राजेंद्र सांगळे, दादा गुंजाळ, साहेबराव वलवे, रोहिदास साबळे, वाल्मिक शिंदे, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, भारत गवळी, वैभव लांडगे, नीलम खताळ, कांचन ढोरे, सुरेखा खरे, अंजना भालसिंग, रुपाली उंडे, दिपाली वाव्हळ, दिलीप रावळ, पांडू शेराल, रवी उडता, रोहित चौधरी, वरद बागुल, भगवान गीते, शशांक नामन, विनायक तांबे, संदेश देशमुख, अक्षय वर्पे, भैय्या सातपुते, कल्पेश पोगुल, सुदर्शन इटप, विशाल एनगंदूल, शिवाजी घोडेकर, प्रवीण कर्पे, जग्गु शिंदे, विकास जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,650
आंदोलन आरपीआय (आठवले) भाजप महायुती शिवसेना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.