Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पहेलगाम अतिरेकी हल्ल्याचा काँग्रेसकडून तीव्र निषेध; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी शहर दणाणले
श्रद्धांजली

पहेलगाम अतिरेकी हल्ल्याचा काँग्रेसकडून तीव्र निषेध; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी शहर दणाणले

जातिभेद आणि कट्टरतावाद हे मानवजातीसाठी धोकादायक आहेत आणि या हल्ल्याचा संगमनेरमधील प्रत्येक नागरिक निषेध करतो आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

जम्मू-कश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा संगमनेर शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी (दि. 23) तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवर कॅण्डल मार्च काढण्यात आला, कॅण्डल मार्चमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘अतिरेक्यांना फाशी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कॅण्डल मार्चमध्ये माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे अध्यक्ष जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, जय हिंद युवा मंच, महाविकास आघाडी, पुरोगामी संघटना आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘फाशी द्या फाशी द्या अतिरेक्यांना फाशी द्या’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘नही झुके नही झुकेंगे’ अशा घोषणांनी वातावरण संतप्त केले होते.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, “अतिरेक्यांनी केलेला हा हल्ला अत्यंत भ्याड आणि निंदनीय आहे. सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेकी आत कसे आले, हा गंभीर प्रश्न आहे. या आतंकवाद्यांना मृत्युदंडाची शिक्षा व्हायलाच पाहिजे. आतंकवाद ही जगाला लागलेली कीड आहे आणि ती संपवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने लढायला हवे. जातिभेद आणि कट्टरतावाद हे मानवजातीसाठी धोकादायक आहेत आणि या हल्ल्याचा संगमनेरमधील प्रत्येक नागरिक निषेध करतो आहे.”

डॉ. जयश्री थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. सामान्य माणूस आपल्या कमाईतील थोडे थोडे पैसे जमा करून काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न पाहतो आणि अशा आतंकवादी हल्ल्यांमुळे त्यांचे जीवन संपते, हे अत्यंत चिंताजनक आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व जाती-धर्म आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.

आता भारतीय नागरिक म्हणून एक होण्याची वेळ आली आहे. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या २७ निष्पाप नागरिकांचा काय दोष होता? यात महाराष्ट्रातील सहा लोकांचा समावेश आहे. सरकारने या अतिरेक्यांना पकडून मृत्युदंड देऊन या हल्ल्याचा बदला घ्यावा.”

मार्चमध्ये संगमनेर शहर आणि युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, किशोर टोकसे, गणेश मादास, अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, शैलेश कलंत्री, प्रा. बाबा खरात, गणपतराव सांगळे, जीवन पंचारिया, राणीप्रसाद मुंदडा, अंकुश ताजणे, रमेश नेहे, सुरेश झावरे, वैष्णव मूर्तडक, डॉ. विजय पवार, प्रीतम साबळे, सोमनाथ गुंजाळ, सचिन खेमनर, सुरभी मोरे, अभय खोजे, प्रदीप हासे, किरण रोहम, अमित गुंजाळ, दीपक शिंदे, किशोर बोऱ्हाडे, आदित्य बर्गे, अलोक बर्डे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी विश्वास मुर्तडक आणि प्रा. बाबा खरात यांनीही पाकिस्तानच्या धोरणांवर टीका केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 858
कॅन्डल मार्च जयश्री थोरात पहेलगाम अतिरेकी हल्ला सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

04/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

01/08/2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

26/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ किंवा जबाबदारीची पूर्तता…

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.