Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उंबरी बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; छत्रपती शिवरायांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही
राजकारण

उंबरी बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; छत्रपती शिवरायांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही

“गाव जर ठराविक रक्कम देऊन शांत होत असेल, तर आमच्या पैशाची किंमत काहीच नाही. आमच्यासाठी कार्यकर्त्यांची किंमत अधिक आहे. त्यामुळे गाव शांत राहावे, याच भूमिकेतून हे काम केले.”
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – आश्वी 

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६) सायंकाळी मोठ्या उत्साहात झाले. याप्रसंगी बोलताना डॉ. विखे यांनी उंबरी बाळापूर ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले आणि छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

डॉ. विखे पाटील म्हणाले, उंबरी बाळापूरमधील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज साकार झाले आहे. विशेष म्हणजे, हे स्मारक उभारणीत गावातील १५ ते ८० वर्षांपर्यंतच्या सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी सक्रिय योगदान दिले आहे. महाराजांच्या आगमनाने गावाची शोभा वाढली आहे. गावात काही अंतर्गत वाद होते, परंतु त्यातून मार्ग काढत विखे पाटील कुटुंबाला हे पुण्य आणि जबाबदारीचे काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, ते आपल्या सर्वांचे दैवत आहेत आणि त्यांच्या विचारानुसारच बहुजन समाजाला एकत्र घेऊन गावाला विकासाच्या दिशेने नेले जाईल. हा कार्यक्रम कोणत्याही एका पक्षाचा नसून, यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांसारख्या सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते, हे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो, तेव्हा जात, धर्म आणि पक्ष आडवे येत नाहीत, हे उंबरी बाळापूरच्या ग्रामस्थांनी सिद्ध करून दाखवले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यानंतर कोल्हार आणि शिर्डी येथेही भव्य शिवसृष्टी साकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला. तसेच, हा कार्यक्रम पक्षीय नसला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेसाठी जे निर्णय घेतील, त्याला गावकऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले, ज्याला उपस्थितांनी ‘भारत माता की जय’ घोषाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुतळा उभारणीदरम्यान गावात झालेल्या अंतर्गत वादावर भाष्य करताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “गाव जर ठराविक रक्कम देऊन शांत होत असेल, तर आमच्या पैशाची किंमत काहीच नाही. आमच्यासाठी कार्यकर्त्यांची किंमत अधिक आहे. त्यामुळे गाव शांत राहावे, याच भूमिकेतून हे काम केले.” भविष्यात उंबरी बाळापूर गावातील इतर सर्व प्रश्नही ताकदीने सोडवून कोणतेही काम प्रलंबित ठेवणार नाही, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 706
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.