Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मालपाणी उद्योग समूहाचा सामाजिक बांधिलकीतून उपक्रम; येत्या बुधवारी ३५ जोडप्यांचा शुभविवाह
सामाजिक

मालपाणी उद्योग समूहाचा सामाजिक बांधिलकीतून उपक्रम; येत्या बुधवारी ३५ जोडप्यांचा शुभविवाह

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची दिमाखदार तयारी!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
येथील प्रतिष्ठित मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. येत्या बुधवारी (३० एप्रिल) अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी हा सोहळा मालपाणी लॉन्स येथे संपन्न होणार असून, यात हिंदू आणि बौद्ध धर्मातील एकूण ३५ नववधू आणि वर विवाहबद्ध होणार आहेत.
सामाजिक दायित्वाच्या भावनेतून मालपाणी उद्योग समूहाने गेली २८ वर्षे हा स्तुत्य उपक्रम अविरतपणे सुरू ठेवला आहे. यावर्षी केवळ एक रुपया नोंदणी शुल्कात ३५ जोडप्यांनी या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार अमोल खताळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून नवदांपत्यांना आशीर्वाद देणार आहेत.
सोहळ्यासाठी भव्य व्यवस्था… मालपाणी लॉन्सचा परिसर नववधू आणि वरांच्या स्वागतासाठी आकर्षक कमानी व फुलांनी सजवण्यात आला आहे. विवाहस्थळी येणाऱ्या पाहुण्यांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी स्वागत कक्ष तसेच चौकशी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी विवाह मंडपाच्या संपूर्ण परिसरात मंडप उभारण्यात आला आहे, तसेच शीतल हवा आणि आरामदायक वातावरणासाठी वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. एकाच वेळी हजारो पाहुण्यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, वरांची पारंपरिक मिरवणूक काढण्यासाठी आकर्षक वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. दुपारच्या सत्रात पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी सदाबहार गाण्यांच्या मैफिलीचे आयोजनही करण्यात आले आहे.
दुपारी साडेचार वाजता शुभमुहूर्त… या सामुदायिक विवाह सोहळ्याला बुधवारी दुपारी साडेचार वाजता प्रारंभ होणार आहे. हा विवाह सोहळा अत्यंत देखणा, आकर्षक आणि अविस्मरणीय व्हावा यासाठी विविध समित्या कार्यरत आहेत. मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने विवाहबंधनात अडकणाऱ्या प्रत्येक नवदाम्पत्याला सुमारे २५ हजार रुपये किंमतीच्या संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात येणार आहेत.
या भव्य आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या सोहळ्याला उपस्थित राहून नववधू-वरांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाचे मनीष मालपाणी यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 883
मालपणी उद्योग समूह मालपाणी उद्योग समूह सामुदायिक विवाह सोहळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.