Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री राज्यात सुशासन पर्व आणणार, आता जीआर होणार इतिहास जमा; असेल AI आधारित एकच GR!
प्रशासन

मुख्यमंत्री राज्यात सुशासन पर्व आणणार, आता जीआर होणार इतिहास जमा; असेल AI आधारित एकच GR!

ग्रामविकास विभागातील सुधारणा प्रक्रियेसाठी नेमलेल्या सहा समित्यांपैकी एका समितीला हे काम सोपवण्याचा निर्णय घेतला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जुने आणि कालबाह्य शासन निर्णय रद्द करून एकच प्रमाणित आणि अद्ययावत शासन निर्णय तयार केला जाईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई: 

राज्य शासनाने विविध काळात जारी केलेले अनेक शासन निर्णय (GR) सध्याच्या परिस्थितीत लागू आहेत की नाहीत, हे समजणे प्रशासकीय कामकाजासाठी एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे कामकाजात गोंधळ निर्माण होऊन निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जुने आणि कालबाह्य शासन निर्णय रद्द केले जातील. त्याऐवजी, एकच अद्ययावत, प्रमाणित आणि स्पष्ट शासन निर्णय तयार करण्यात येईल. यामुळे शेतकरी, नागरिक आणि शासकीय अधिकारी यांना सुलभ मार्गदर्शन मिळणार असून, कामकाजातील विलंब कमी होईल.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बैठकांमध्ये प्रशासकीय समस्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, अनेकदा नागरिक आणि कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार जुने, कालबाह्य झालेले शासन निर्णय सादर करतात, ज्यामुळे कामकाजात अडथळे येतात आणि सामान्य लोकांना योग्य निर्णय मिळण्यास विलंब होतो.

शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सुरुवातीला एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, गोरे यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवून जुने शासन निर्णय थेट रद्द करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागातील सुधारणा प्रक्रियेसाठी नेमलेल्या सहा समित्यांपैकी एका समितीला हे काम सोपवण्याचा निर्णय घेतला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जुने आणि कालबाह्य शासन निर्णय रद्द करून एकच प्रमाणित आणि अद्ययावत शासन निर्णय तयार केला जाईल.

या निर्णयामुळे शासकीय कामकाजात गती येण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजना जलद आणि अचूक पद्धतीने मिळतील. तसेच, प्रशासनाच्या विश्वासार्हतेत वाढ होऊन शासकीय सेवा अधिक प्रभावी होतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,025
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) देवेंद्र फडणवीस शासन निर्णय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.