Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात महाराष्ट्र दिनी ‘समतेची मिसळ’
सामाजिक

संगमनेरात महाराष्ट्र दिनी ‘समतेची मिसळ’

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून, लोककल्याण आणि समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर: 

महाराष्ट्र दिनानिमित्त संगमनेर युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी, (१ मे २०२५) सकाळी ८ ते १२ या वेळेत नवीन नगर रोड येथे ‘समतेची मिसळ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना घेऊन सर्वधर्मीय आणि सर्व समाजाच्या सहकार्यातून हा उपक्रम होत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून, लोककल्याण आणि समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका एक कुटुंब म्हणून ओळखला जातो आणि याच बंधुभावाला अधिक दृढ करण्यासाठी हा ‘समतेची मिसळ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात तालुका आणि शहरातील सर्व धर्मीय व सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन मिसळ बनवण्यासाठी योगदान देणार आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमातून समता आणि बंधुभाव वाढावा, हा युवक काँग्रेसचा उद्देश आहे. तरी, संगमनेर शहरातील सर्व नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,037
जयश्री थोरात बाळासाहेब थोरात महाराष्ट्र दिन समतेची मिसळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.