Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अटल भूजल योजनेत खांडगावची दमदार कामगिरी; जिल्हा स्तरावर पटकावला प्रथम क्रमांक, ५० लाखांचे बक्षीस
यश / निवड / पुरस्कार

अटल भूजल योजनेत खांडगावची दमदार कामगिरी; जिल्हा स्तरावर पटकावला प्रथम क्रमांक, ५० लाखांचे बक्षीस

खांडगाव ग्रामपंचायतीने भूजल संवर्धनाच्या क्षेत्रात केलेले हे कार्य इतर गावांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर: 

संगमनेर तालुक्याने पुन्हा एकदा विकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने अटल भूजल योजनेअंतर्गत आयोजित ‘भूजल समृद्ध ग्राम’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल गावाला तब्बल ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या खांडगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी देखील ‘माझी वसुंधरा ४.०’ अभियानात राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले होते. त्यावेळी गावाने लोकसहभागातुन पृथ्वीच्या पाच पंचतत्वांवर काम केले, आता २०२३-२०२४ या वर्षात भूजल संवर्धनाच्या क्षेत्रात मिळालेले हे दुसरे मोठे यश गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि प्रभावी नेतृत्वाचे प्रतीक आहे. नुकतीच या पुरस्कारांची यादी जाहीर झाली असून, यात अहिल्यानगर जिल्ह्यातून खांडगावने बाजी मारली आहे.

या यशामागे सरपंच ॲड. विकास गुंजाळ, माजी सरपंच व श्यांप्रोचे संचालक सोमनाथ गुंजाळ, उपसरपंच सुनील रुपवते यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी उज्वला नवले व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे समर्पित प्रयत्न व कुशल नेतृत्व कारणीभूत ठरले आहेत. या सर्वांनी गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून भूजल व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट काम केले.

या महत्त्वपूर्ण यशाबद्दल बोलताना युवा सरपंच ॲड. विकास गुंजाळ म्हणाले, “आम्ही कधीही पदाचा केवळ दिखावा न करता, लोकांच्या हितासाठी आणि गावाच्या विकासासाठी काम करण्यावर भर दिला. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून निवडून दिल्यानंतर, त्यांच्यासाठी सर्वोत्तम कार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. एकजूट आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवून केलेल्या कामामुळेच आम्हाला हे यश मिळाले आहे.”

पुरस्काराच्या माध्यमातून मिळणारी ५० लाख रुपयांची रक्कम भूजल व्यवस्थापनाच्या कामांसाठी वापरली जाणार आहे. त्यातून गावाच्या भुजल पातळीत वाढ होऊन गावचा सर्वागीन विकास होईल व गाव समृद्धी च्या दिशेने वाटचाल करेल यासोबतच, खांडगावची आता राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे, हे आणखी एक अभिमानास्पद बाब आहे. या दोन्ही पुरस्कारांच्या माध्यमातून गावाने एक वर्षात एकूण एक कोटी रुपयांची बक्षिसे मिळवली आहेत, असेच ग्रामपंचायत मार्फत अनेक लोक उपयोगी कामे केली तर खांडगावचे नाव भविष्यात महाराष्ट्राभर झळकेल असेही त्यांनी सांगितले. माजी सरपंच सोमनाथ गुंजाळ व यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व अनुभव हे या यशात महत्त्वाचे आहे, असे मत ॲड. विकास गुंजाळ यांनी व्यक्त केले.

एकंदरीत, खांडगाव ग्रामपंचायतीने भूजल संवर्धनाच्या क्षेत्रात केलेले हे कार्य इतर गावांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. लोकसहभाग आणि योग्य नेतृत्वाच्या बळावर विकास आणि पर्यावरण संरक्षण एकाच वेळी साधता येते, हे खांडगावने सिद्ध करून दाखवले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 851
अटल भूजल योजना भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा विकास गुंजाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

16/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुण्यात विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला…

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.