Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमृतवाहिनी बँकेचा देश पातळीवर डंका; ‘भारतरत्न सहकारिता’सह तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
यश / निवड / पुरस्कार

अमृतवाहिनी बँकेचा देश पातळीवर डंका; ‘भारतरत्न सहकारिता’सह तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

आधुनिक डिजिटल प्रणाली, अचूक कामकाज, तत्पर ग्राहक सेवा, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सुमारे १२०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल या बळावर राष्ट्रीय स्तरावर हे यश संपादन केले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर:
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या उत्कृष्ट कामकाजाची दखल घेत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे संपन्न झालेल्या ‘भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट २०२६’ मध्ये बँकेला देश पातळीवरील सर्वोच्च ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. या मुख्य पुरस्कारासोबतच बँकेला इतर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
या समिटमध्ये अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांना ‘बेस्ट चेअरमन’, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांना ‘बेस्ट सीईओ’ आणि बँकेने सातत्याने राखलेल्या शून्य टक्के नेट एनपीएबद्दल ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आसाम राज्य सहकारी बँकेचे चेअरमन व आमदार विश्वजीत फुकण, भारत नेटवर्क ग्रुपचे अनुपम गुप्ता आणि आशिष श्रीवास्तव यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती आणि असिस्टंट जनरल मॅनेजर धनंजय जाधव यांनी हा बहुमान स्वीकारला.
अमृतवाहिनी बँकेने आधुनिक डिजिटल प्रणाली, अचूक कामकाज, तत्पर ग्राहक सेवा, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सुमारे १२०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल या बळावर राष्ट्रीय स्तरावर हे यश संपादन केले आहे. चेअरमन सुधाकर जोशी यांच्या नियोजनातून बँकेची गुणवत्ता वाढली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांच्या कुशल प्रशासनामुळे बँकेने आर्थिक शिस्त राखली आहे.
हा पुरस्कार संपूर्ण टीमच्या सांघिक कष्टाचे आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याची भावना चेअरमन सुधाकर जोशी यांनी व्यक्त केली. या अभूतपूर्व यशाबद्दल माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अमृतवाहिनी बँकेचे विशेष अभिनंदन केले आहे. या राष्ट्रीय सन्मानामुळे संगमनेरच्या सहकार चळवळीचा गौरव देशपातळीवर वाढला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 464
अमृतवाहिनी बँक पुरस्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.