Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुती सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखेंच्या अडचणीत वाढ, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल
गुन्हेगारी

महायुती सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखेंच्या अडचणीत वाढ, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १८ मार्च २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, राहाता न्यायालयाने यापूर्वी दिलेला निर्णय कायम ठेवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर:

राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यासह ५४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी (ता. राहाता) पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात विखे पाटील यांच्यासह ५४ जणांचा समावेश आहे. २००४ ते २००६ या कालावधीत कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासद शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून ८ कोटी ८६ लाख १२ हजार २०६ रुपयांचे कर्ज काढल्याचा, त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

बाळासाहेब केरुनाथ विखे (वय ६६) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ते विखे पाटील कारखान्याचे ४० वर्षांपासून सभासद आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, कारखान्याच्या संचालक मंडळाने युनियन बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून ३ कोटी ११ लाख ६० हजार ९८६ रुपये आणि ५ कोटी ७४ लाख ४२ हजार २२० रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. हे कर्ज सभासद शेतकऱ्यांच्या नावाने मंजूर झाले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ते कधीही मिळाले नाही. या व्यवहारात तत्कालीन बँक अधिकारी आणि कारखान्याच्या संचालकांनी संगनमत करून अपहार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १८ मार्च २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, राहाता न्यायालयाने यापूर्वी दिलेला निर्णय कायम ठेवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त आणि बँकेच्या अधिकाऱ्यांसह एकूण ५४ जणांवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,670
प्रवरा साखर कारखाना फसवणूक गुन्हा राधाकृष्ण विखे पाटील लोणी पोलीस स्टेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- तणावग्रस्त जीवनशैलीच्या काळात लोकांना हसवणे हे सर्वात मोठे पुण्याचे…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.