Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोमांस वाहतूक करणारी अलिशान कार घारगाव पोलिसांच्या जाळ्यात; 5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त… पालकमंत्री विखे पाटील, आमदार खताळ यांच्या निर्देशानंतरही संगमनेरमध्ये अवैध धंदे सुरूच!
गुन्हेगारी

गोमांस वाहतूक करणारी अलिशान कार घारगाव पोलिसांच्या जाळ्यात; 5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त… पालकमंत्री विखे पाटील, आमदार खताळ यांच्या निर्देशानंतरही संगमनेरमध्ये अवैध धंदे सुरूच!

पथकाने पंचांना सोबत घेऊन पुणे-नाशिक महामार्गाच्या बाजूला असलेल्या मुळा नदीच्या पुलाजवळ सापळा रचला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
पुणे-नाशिक महामार्गावर घारगावजवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत गोमांसाची वाहतूक करणारी एक अलिशान कार पकडली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 28 एप्रिल) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघा आरोपींविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती की संगमनेरहून पुणेच्या दिशेने एका अलिशान कारमधून गोमांसाची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तात्काळ कार्यवाही करत पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे, पोलीस कॉन्स्टेबल गाडेकर आणि सुभाष बोडखे यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
या पथकाने पंचांना सोबत घेऊन पुणे-नाशिक महामार्गाच्या बाजूला असलेल्या मुळा नदीच्या पुलाजवळ सापळा रचला. काही वेळानंतर, संगमनेरच्या बाजूने पुण्याकडे एक इकोस्पोर्ट कार (क्रमांक एमएच.01, बीके.3545) येताना दिसली. कारमध्ये समोरच्या सीटवर दोन व्यक्ती बसलेल्या असल्याचे पोलिसांना दिसले. संशय आल्यानंतर पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा केला.
चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवल्यानंतर पोलिसांनी कारमध्ये काय आहे, अशी विचारणा केली. मात्र, चालकाने समाधानकारक उत्तरे न देता टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष कारची तपासणी केली असता, मागील सीट काढून टाकलेली आणि काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कागदात मोठ्या प्रमाणात गोमांस भरलेले आढळून आले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार फिरोज सिकंदर शेख (वय 37) आणि अयाज पापामिया मोमीन (वय 32, दोघेही रा. अळकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे अंदाजे 700 किलो गोमांस आणि 4 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

संगमनेर मधील अवैध धंद्यांना पाठबळ कोणाचे… दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या एका बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्या पाठोपाठ, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना संगमनेर मधील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे निर्देश देताना कोणालाही पाठीशी न घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या. खताळ यांच्या आदेशाला काही तास उलटत नाही तोच संगमनेरमधील अवैध धंदे आणि कत्तलखाने सुरूच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायांना नेमके पाठबळ कोणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,433
अमोल खताळ गोमांस कारवाई घारगाव पोलीस राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.