Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कारखान्याच्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार – मंत्री राधाकृष्ण विखे
राजकारण

कारखान्याच्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार – मंत्री राधाकृष्ण विखे

या प्रकरणात कोणताही फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही. आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर

प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या चौकशी अहवालावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कारखान्याच्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

विखे म्हणाले, “२०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, या प्रकरणात कोणताही फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही. आमच्या दृष्टीने हे प्रकरण संपले आहे. तरीही, नव्याने चौकशी झाल्यास आम्ही त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत.”

कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या आरोपांवर विखेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सन २००४ मधील हे प्रकरण विरोधकांनी २०१४ मध्ये उकरून काढले. या प्रकरणी स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या चौकशी अधिकाऱ्यांचा अहवाल स्वीकारून, २०१९ मध्ये कोणताही फौजदारी गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले आहे.”

विखेंनी विरोधकांवर टीका करताना म्हटले, “महायुतीचे यश अनेकांना बघवत नाही. व्यक्तिद्वेषापोटी मला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. निवडणुकीत वातावरण निर्माण करून आरोप करणे, ही त्यांची सवय आहे. या प्रकरणात त्यांचा ‘बोलविता धनी’ कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे. निवडणुकीत सभासदांना सामोरे न जाता, आता हे आरोप करणे म्हणजे जनतेचा विश्वास गमावल्याचे लक्षण आहे.”

विखेंनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाने मार्च २०२५ मध्ये दिलेल्या आदेशात कारखाना व्यवस्थापन व इतरांविरुद्ध त्रास होईल अशी कोणतीही जबरदस्तीची कारवाई करू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व शंकांचे निरसन झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 888
प्रवरा साखर कारखाना राधाकृष्ण विखे स्पष्टीकरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- तणावग्रस्त जीवनशैलीच्या काळात लोकांना हसवणे हे सर्वात मोठे पुण्याचे…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.