Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » युवतीच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट; नातेवाईक आणि मित्रांना मेसेज पाठवून बदनामी
गुन्हेगारी

युवतीच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट; नातेवाईक आणि मित्रांना मेसेज पाठवून बदनामी

पोलिसांनी नागरिकांना समाजमाध्यमांचा वापर करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, जर कोणाला अशा प्रकारचे संशयास्पद किंवा बदनामीकारक कृत्य निदर्शनास आल्यास, त्यांनी त्वरित सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – 

अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय युवतीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिची समाजात बदनामी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या बनावट खात्यावरून युवतीच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यात आले, यामुळे तिची आणि तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. या गंभीर प्रकारणी पीडित युवतीने मंगळवारी (२९ एप्रिल) येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२) (अब्रुनुकसानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

युवतीने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, एका अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडले. या खात्यावर तिचे छायाचित्र आणि इतर माहितीचा वापर करून तिच्या जवळच्या लोकांना बदनामीकारक संदेश पाठवले गेले. या कृत्यामुळे समाजात तिची प्रतिमा मलिन झाली असून तिला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

हा प्रकार ११ जानेवारी २०२५ पूर्वी घडला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडितेने या संदर्भात २९ एप्रिल रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना समाजमाध्यमांचा वापर करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, जर कोणाला अशा प्रकारचे संशयास्पद किंवा बदनामीकारक कृत्य निदर्शनास आल्यास, त्यांनी त्वरित सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली असून सायबर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 852
सायबर क्राईम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- तणावग्रस्त जीवनशैलीच्या काळात लोकांना हसवणे हे सर्वात मोठे पुण्याचे…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.