Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाढदिवस विशेष लेख | जनसेवक आमदार अमोलभाऊ खताळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त…
महाराष्ट्र संवाद विशेष

वाढदिवस विशेष लेख | जनसेवक आमदार अमोलभाऊ खताळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त…

लेखक विधीज्ञ असून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/05/2025No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नेत्याचा मुलगा आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला तरी चर्चेचा विषयच बनत नाही, परंतु एका गरीब शेतकऱ्यांच्या पोरगा भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेल्या ४० वर्ष सत्तापदावर असणाऱ्या बलाढ्य नेत्यांला दहा हजार मतांचे फरकाने चितपट करून संदेश देतो की “राजा का बेटा राजा नहीं बन शकता, जो हकदार होगा वही राजा बनेगा.” खरंतर संगमनेर विधानसभा २०२४ निवडणुकीचा निकाल लागला, मतदानाचे सर्व ओपिनियन पोल खोटे ठरवून राजकीय चाणक्याच्या चाणक्य करत अमोलभाऊंनी ऐतिहासिक विजय मिळवला.

खरंतर एकीकडे सत्ता, संस्था, संपत्ती आणि कार्यकर्त्यांची लागलेली रीघ, अनेक वर्षापासूनची तालुक्यात निर्माण केलेली वचक व सत्तेमुळे सामान्य लोकांवर आलेले दडपण अशा परिस्थितीमध्ये संगमनेरमध्ये तुल्यबळ उमेदवार शोधण्याची अडचण महायुतीच्या कार्यकर्त्यांवर आली होती. डॉ. सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेऊन परिवर्तनाची वारे फिरवण्यासाठी सुरुवात केली होती, अशा परिस्थितीत धांदरफळमध्ये सभा झाली. सभेमध्ये एका नेत्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्याचा गैरफायदा उचलून संगमनेरमध्ये उभे राहत असलेल्या महायुतीच्या उमेदवारांची बदनामी करण्याचा मोठा प्रयत्न झाला. तसेच धांदरफळ येथून डॉ. सुजय विखे यांचे सभेतून परतणाऱ्या लोकांवरती प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्यानंतरही अनेक दिवस पक्षश्रेष्ठींचा संगमनेर मतदार संघ शिवसेनेला सोडायचा की भाजपाला यातच मोठा खल चालू होता. प्रस्थापित मोठ्या नेत्यांविरुद्ध अनेक वर्षे विरोधात सत्तापदापासून दूर राहिलेल्या विरोधकांकडे निवडणुकीचे शिवधनुष्य उचलणारा तुल्यबळ उमेदवार सापडत नव्हता, परंतु नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी मोठ्या नेत्याशी संघर्ष करण्यासाठी अमोलभाऊच्या रूपाने एक तरुण, स्वच्छ प्रतिमेचा कार्यकर्ता रणांगणात उतरवला.
खरंतर अमोलभाऊ अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातुन उभा राहिलेला कार्यकर्ता, हातावरचा माणूस, स्वतः छोट्या गाळ्यात इंटरनेट कॅफे चालून उदरनिर्वाह करून, लोकांना फॉर्म भरण्यासाठी मदत करत असे, फक्त लोकांसाठी निरपेक्ष धडपड करणारा तरुण माणूस ईतकीच ओळख, कुठेतरी मन घट्ट करून इतक्या मोठ्या बलाढ्य शक्तीपूढे उभा राहिला होता. तरुण, हसरा चेहरा, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मदतीला धावणारा, रस्ता केस आणि पोलिस स्टेशनला सामान्य माणसाच्या अडचणी सोडणारा नव्या उमेदीचा एक भाजपचा सामान्य कार्यकर्ता. जसे प्रचाराचे दिवस वाढत गेले तसे लोकांत खूप लोकप्रिय बनत गेला, तरूणांनी निवडणूक हातात घेतली. मतमोजणीत मताची आघाडी घेत दहा हजारपेक्षा जास्त मते घेत महाराष्ट्रातील “जायंट किलर आमदार” म्हणून चर्चेत आले.
खरंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत फक्त हातावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवांवर आणि जनतेच्या विश्वासावर संगमनेरच्या विधानसभेचे मैदान जिंकून अमोलभाऊ कार्यकर्त्याचा आमदार झाला. आमदार होऊन सुद्धा “नेता नाही तर कार्यकर्ता” ही वृत्ती किंचितही कमी झाली नाही. गोरगरिबांच्या प्रश्नाना न्याय देण्यासाठी २४ तास घराचे दरवाजे उघडून खऱ्या अर्थाने ते जनसेवक आमदार ठरले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर समाजमाध्यमात सर्वात जास्त चर्चेला आलेले नाव आ. अमोलभाऊ खताळ आहे. डोक्यात भगवी टोपी, अत्यंत साधे राहणीमान, आमदार झाल्यावर सुद्धा साहेब म्हणण्यापेक्षा ‘भाऊ’ म्हणा, असे कार्यकर्त्यांना सूनवणारा, सामान्य माणसात वावर असलेला, दिन, दुबळ्या, वंचित, पीडितांचे, तसेच शेतकरी कामगारांचे उभरते नेतृत्व म्हणून उदयाला आले.
गेल्या ४०वर्षात संगमनेरच्या विकास मॉडेलचा “शांघाय” केला म्हणून आभास करून आरोळ्या मारणाऱ्या माजी नेत्यांना व त्याच्या लाभार्थी कार्यकर्त्यांना उत्तर म्हणून संगमनेर तालुक्याच्या जनतेच्या विकासाच्या प्रश्नावर अमोलभाऊनी पहिल्यांदाच महाराष्ट्राची विधानसभा गाजून सोडली, मग तो नाशिक -पुणे रेल्वे मार्गाचा प्रश्न असो किंवा निव्वळ इंजिनिअरिंग कॉलेज उघडून डिग्री मिळवलेल्या हजारो बेरोजगार झालेल्या तरुणांना न्याय देता न आलेल्या, संगमनेरकरासाठी महाराष्ट्राचे शिवसेनेचे सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे शब्द टाकून एमआयडीसीची मागणी मंजूर करून संगमनेरकराच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. वक्फ जमिनीचा प्रश्न असेल, अवैध धंदे, वाळूतस्करी, गोहत्या तसेच संगमनेर शहरातील अतिक्रमण प्रश्न असेल यांवर आवाज उठवला. संगमनेर तालुक्यातील निमोण-तळेगांव पट्टयातील भोजापुर चारीचा प्रश्न असेल, निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्याचे अस्तरीकरणांचा, वितारीका (चाऱ्या) काढण्यासाठीच्या निधीसाठी तसेच साकुर व पठार भागासाठी वरदान ठरणाऱ्या मोरदरा धरणाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडून लाखो शेतकऱ्यांना न्याय देऊन संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी धरणासाठी सुधारित प्रस्थापित मान्यता (सु. प्र.मा.) व निधी आणण्यासाठी महाराष्ट्राचे पाटबंधारे तथा जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. काही दिवसांत संगमनेरकरांचे स्वप्नं सत्यात उतरवण्यात ते नक्कीच यशस्वी होतील. औरंगाबाद नामांतरबाबत सरकारने कठोर भूमिका घेण्याबाबत तसेच पहिल्याच दिवशी विधानसभा सभागृहाच्या पायऱ्यांवर लोकशाहीत जनता सर्वांच्च बनवते हे नतमस्तक होऊन संस्कृतीशी समरस होण्याचे उदाहरण धर्म योद्धा आ. अमोलभाऊ खताळ यांनी महाराष्ट्राला दाखवले. जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या सभागृहाचा सन्मान कसा केला गेला पाहिजे हे त्यांच्या कृतीतुन महाराष्ट्राला दिसले, अशा आमचे नेतृत्व असणाऱ्या अमोलभाऊ खताळ साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! तुमच्या यशस्वी राजकारणातील प्रवासाला आणखीन उंची मिळो. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मंत्रिपदाची जबाबदारी आपल्याला मिळो! तुमच्या नेतृत्वाखालील समाजकार्यास नवे आयाम लाभोत!

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 989
ॲड. गोरक्ष कापकर अमोल खताळ वाढदिवस विशेष विशेष लेख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली…

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.