Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध धंद्यांवर एलसीबीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! एकाच वेळी २३ ठिकाणी छापे, ३४ आरोपी गजाआड, लाखोंचा माल जप्त!
गुन्हेगारी

अवैध धंद्यांवर एलसीबीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! एकाच वेळी २३ ठिकाणी छापे, ३४ आरोपी गजाआड, लाखोंचा माल जप्त!

या धडक कारवाईत अवैध दारू विक्री, जुगार आणि इतर अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या ३४ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल २ लाख ८३ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/05/2025Updated:08/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. एकाच वेळी जिल्ह्यातील २३ ठिकाणी धाडी टाकून एलसीबीने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या धडक कारवाईत अवैध दारू विक्री, जुगार आणि इतर अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या ३४ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल २ लाख ८३ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी तातडीने हालचाल करत पाच विशेष पथके तयार केली. या पथकांनी अहिल्यानगर तालुका, श्रीरामपूर शहर, नेवासे, श्रीगोंदे आणि राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी २३ ठिकाणी धाडी टाकल्या.
एलसीबीच्या पथकांनी केलेल्या या कारवाईत प्रामुख्याने अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. यासोबतच जुगार खेळणाऱ्यांवर आणि इतर अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणि जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले होते. अनेक गावांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. मात्र, स्थानिक पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अशा परिस्थितीत एलसीबीने केलेली ही मोठी कारवाई निश्चितच दिलासा देणारी आहे.
या यशस्वी कारवाईत पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, शाहीद शेख, गणेश धोत्रे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, गणेश भिंगारदे, मनोहर गोसावी, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, सुनील मालणकर, अरुण गांगुर्डे, सोमनाथ झांबरे, अशोक लिपणे, किशोर शिरसाठ, अतुल लोटके यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांकडून ही कारवाई अधिक व्यापक आणि नियमित करण्याची मागणी होत आहे, जेणेकरून अवैध धंद्यांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. एलसीबीने दाखवलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,252
अवैध धंदे छापेमारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील प्रवाशांच्या सुविधेसाठी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी…

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.