Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील तरुणीवर मुंबईत अत्याचार, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरमधील तरुणीवर मुंबईत अत्याचार, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दबावाखाली येऊन मुलीने पोलिसांसमोर सांगितले की तिने आणि मुलाने स्वतःच्या मर्जीने लग्न केले आहे आणि यात कोणाचाही संबंध नाही. याबाबत पोलिसांकडून लेखी जबाबही घेण्यात आला.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 9, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

तालुक्यातील एका तरुणीला फसवून मुंबईतील मालाड येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कॉलेजमध्ये परीक्षेसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. पेपर दिल्यानंतर कॉलेजबाहेर असताना तिला एका अज्ञात मुलाचा फोन आला. त्याने तिला घुलेवाडी येथे एका महिलेच्या घरी येण्यास सांगितले. त्यानुसार ती तिथे गेली. त्यानंतर, तेथे उपस्थित असलेल्या दोन संशयित तरुणांनी तिला जबरदस्तीने थार गाडीमध्ये बसवून मालाड येथे नेले.

मालाडमधील एका हॉटेलमध्ये तिला चार ते पाच दिवस डांबून ठेवण्यात आले. या दरम्यान, मुख्य संशयित आरोपी तरुणाने तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि त्याच्याजवळील धारदार हत्याराचा धाक दाखवून तिच्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पीडित तरुणीने घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली असता, आरोपीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या कृत्यात मदत करणाऱ्या एका महिलेने आरोपीला फोन करून सांगितले की, तरुणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल झाली आहे, त्यामुळे त्यांना परत बोलावून घेतले.

त्यानंतर आरोपी तिला मुंबईहून संगमनेरकडे घेऊन आला आणि तेथून ते तळेगाव दिघे येथे आरोपीच्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी, आरोपीच्या आईने पीडित मुलीला पोलीस ठाण्यात बोलावून “माझ्या मुलाच्या बाजूने बोल,” असे सांगितले. दबावाखाली येऊन मुलीने पोलिसांसमोर सांगितले की तिने आणि मुलाने स्वतःच्या मर्जीने लग्न केले आहे आणि यात कोणाचाही संबंध नाही. याबाबत पोलिसांकडून लेखी जबाबही घेण्यात आला.

तळेगाव दिघे येथे आरोपीच्या घरी गेल्यानंतर, पीडित तरुणीला आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे जाणवले. तिने याबद्दल विचारणा केली असता, आरोपीने सांगितले की, “हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. माझे तुझ्यासोबत लग्न होण्यासाठी संबंधित महिलेला पैसे द्यायचे होते आणि ती आता तेच पैसे मागण्यासाठी येत आहे.” या संदर्भात तरुणीने त्या महिलेशी संपर्क साधला असता, महिलेने तिला मारहाण केली. हे पाहून काही लोकांनी तरुणीच्या नातेवाईकांना बोलावले. त्यानंतर, पीडित तरुणीने घरी परतल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आणि पोलिसात धाव घेतली.

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून संगमनेर पोलिसांनी रोहित मधुकर दिघे (रा. तळेगाव दिघे), सौरभ अरुण शिंदे, सुरज अरुण शिंदे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) आणि दोन अज्ञात महिला यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 4,570
तरुणीवर अत्याचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 10, 20260

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.