Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख — देशात बसलेल्या घरभेद्यांनाही ठेचा!
विश्लेषण

रविवार विशेष लेख — देशात बसलेल्या घरभेद्यांनाही ठेचा!

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/05/2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
पहेलगाममध्ये बंदुकींच्या गोळ्यांचा उच्छाद मांडणार्‍या पाकपुरस्कृत दहशतवादाला जशास तसं तोंड देणार्‍या भारतीय संरक्षण दलाच्या जवानांचं सुरुवातीलाच कौतुक.. दहशतवादाचं मुळ असलेल्या पाकिस्तानच्या तळांवर सुरू असलेल्या छुमश्‍चक्रीने देशवासीय आनंदले नसते तर नवलच. सरकारच्या नीतीवर कोणताही संशय न घेता संरक्षण दलांनी सुरु केलेल्या या कारवाईला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका देशातील विरोधी पक्षांनी घेतल्याने सरकार म्हणून सत्ताधार्‍यांची जबाबदारी अधिकच वाढलीय. याचा अर्थ सैनिकांच्या नावाने स्वत:च्या छब्या नाचवणं नव्हे. वायू दलाने सियालकोटसह नऊ ठिकाणांना लक्ष्य करत पाकिस्तानला अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. याबद्दल तिन्ही दलाचं आणि केंद्रातल्या सरकारचं कौतुक केलंच पाहिजे. मात्र तरीही मागे वळून पाहिलं नाही तर पहेलगामसारख्या घटना घडतच राहतील. इतिहास विसरला तो वर्तमानाला तोंड देऊ शकत नाही आणि वर्तमानाकडे दुर्लक्ष करणारे भविष्य घडवू शकत नाही, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. काश्मीरमधील दहशतवाद निपटून काढण्यासाठी आवश्यक असलेल्या कारवाया वेळीच झाल्या असत्या तर पहेलगामसारखी घटना घडली नसती, हे मान्यच करावं लागेल. मात्र याविषयी कोणी बोलत नाही. जे बोलतात त्यांना देशद्रोहाच्या व्याख्येत बसवलं जातं. जाब विचारणार्‍यांच्या भूमिकेवर शंका घेतली जाते. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारासारख्या घोषणा होतात. पोलिस आणि तत्सम यंत्रणांना त्याच्या मागावर लावलं जातं. यामुळे ज्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा तो टाकला जात नाही. पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. मग पुलवामा आणि पहेलगाम घडतच रहातं.
पाकमधील दहशतवादी तळांवर भारताकडून हल्ले झाल्यावर देशातल्या तमाम लोकांनी जवानांचं कौतुक केलं. विरोधी पक्षांनी मागच्या घटना दुर्लक्षून सरकारला पूर्ण समर्थन दिलं. म्हणून सरकारला कोणाला अंधारात ठेवून निर्णय घेता येणार नाही. विरोधी पक्ष नेत्यांसह एकत्रित बैठका बोलवण्यात आल्या. पण तिथे पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते. गंभीर घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मोदी थेट बिहारला पोहोचतात. नंतर दिल्लीत असूनही बैठकीला येत नाहीत, याचा अर्थ न समण्याइतकी भारतीय जनता दुधखुळी नाही. मोदी बैठकीला आले नाहीत, अशी चर्चा होणं ही बाब देश संरक्षणासाठी घातक आहे, हे मोदींना कळत नाही? संकट काळात देशाच्या प्रमुखाने बैठकीला न येणं याचा अर्थ काय निघतो? तुम्ही काहीही सांगितलं तरी निर्णय घ्यायला मी मोकळा, असा हा अहंकार होय. या अहंकाराची चर्चा अशा गंभीर प्रसंगी करायची नाही? देशाच्या सुरक्षेत येणारा हा दांभिकपणा मोदींनी सोडला पाहिजे. तुम्ही काहीही करा, मला घ्यायचा तो निर्णय मी घेईन, ही दांडगाई देशाला परवडणारी नाही.
संरक्षण दलाने केलेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर विचारलेल्या प्रश्‍नांनी सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. सवयीप्रमाणे भाजप आणि सत्तेतले मंत्री राज यांना दोष द्यायला मोकळे आहेत. इतर कोणी सवाल केला असता तर या मंत्र्यांनी आणि भक्तांनी त्याला बदनाम करून सोडलं असतं. पण राज यांच्या सवालात असलेलं गांभीर्य सत्ताधार्‍यांनाही दुर्लक्षिता येत नसल्याने ते कचरत आहेत. राज यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर जाणकार बोलू लागले आहेत. युध्दाची चर्चा आपण एअरकंडिशनमध्ये बसून करत असताना पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी आपल्या जवानांना जोखिमा पत्कराव्या लागणार आहेत. जिवाची पर्वा न करता जवानांना परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. अशा वेळी खर्चाच्या गणतीला मर्यादा राहत नाही. हा सारा भार देशवासीयांवर पडतो. आधीच महागाईने देशातला नागरिक भरडला जात असताना अशी युध्दजन्य परिस्थिती त्याला आणि त्यानुशंगाने देशाला परवडेल? या प्रश्‍नाचं उत्तर अर्थात नाही, हेच आहे. राज ठाकरे यांच्या अनेक प्रश्‍नांमधील ही गोष्ट नजरेआड करता येणार नाही. पाकिस्तान हा कर्जाऊ देश आहे. भारताचं तसं नाही. हा देश सार्वभौम लोकशाही अंगिकारलेला देश आहे. अशा लोकशाहीच्या देशात चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. राज यांनी हे प्रश्‍न विचारताना आपल्यावर काय टीका होईल, आपल्याला काय जाब विचारला जाईल, याची तमा बाळगलेली नाही. पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी कारवाईनंतर हल्ला करणारे दहशतवादी गेले कुठे? याचा काही पत्ता आहे की नाही, हा साधा प्रश्‍न राज यांचा आहे. या ठिकाणपासून पाकिस्तान सीमा अडीचशे ते तीनशे किलोमीटर डोंगरपार अंतरावर असेल तर हे दहशतवादी गेले कुठे? ते हाती सापडत नाहीत, याचा दोष आपल्या यंत्रणांच्या अपयशाकडे जातो.
ही चुक एका पहेलगामपुरती मर्यादित असती तर एकवेळ याकडे दुर्लक्ष करता आलं असतं. सशस्त्र दलाच्या 42 जवानांचा हकनाक बळी घेणार्‍या पुलवामा येथील दहशतवादी कारवाईतील एकाही अतिरेक्याला आपण धडा शिकवू शकलो नाही. हा हल्ला म्हणजे भारताच्या संरक्षण दलावरील काळा अध्याय होय. इतक्या संख्येने जवान प्राणाला मुकूनही दहशतवादी हाती का लागला नाही? करण थापर यांनी काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची नुकतीच मुलाखत घेतली होती. पुलवामा हत्याकांडावेळी केंद्राने अंगिकारलेल्या एकाधिकारशाहीचा पुरता परदाफाश मलिक यांनी करून टाकला. तोच सवाल राज यांनी विचारलाय. या प्रश्‍नांची चर्चा होणार नसेल तर पहेलगामसारख्या घटना या होतच राहणार. सुरक्षा दल त्याकडे गांभीर्याने पाहत नसेल तर काहीही झालं तरी देश सुरक्षित राहील, असं खात्रीने कोणीही सांगू शकणार नाही. ज्याच्याकडे पुलवामाची जबाबदारी होती तो देविंदर सिंग हल्ल्याच्या महिनाभर आधी दिल्लीत येऊन सत्ताधार्‍यांच्या भेटी घेतो. आणि काश्मीरमध्ये गेल्यावर राज्यपालांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतो, पुढे त्याला बढती मिळते, असं का होतं. या घरभेद्याचं काहीच वाकडं झालं नाही.
दुसरीकडे देशातलेच काही लोक पैशांच्या अमिशाने आणि अश्‍लील चाळ्यांच्या नशेत देश विक्रीला काढत आहेत. मात्र तरीही त्यांची संघाचे स्वयंसेवक तरफदारी करत आहेत. या सत्तेत यातल्या एकालाही अजून शिक्षा झाल्याचं ऐकिवात नाही. प्रदिप कुरुळकर हा यातला प्यादा. स्वत:ला आरएसएसचा स्वयंसेवक म्हणवून घेणार्‍या या माणसाने झारा दासगुप्ता या आपली मुलगी समजावी अशा लंडनमधल्या छान छबिलीच्या नंगेपणाला भाळून संरक्षण संशोधन प्रणालीतील महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरवली. ब्रम्होस आणि अग्नीसारखी क्षेपणास्त्रांच्या वापरासह संशोधन क्षेत्रातील अत्यंत महत्वाची माहिती पुरवणारा हा माणूस या क्षेत्रात 30 वर्षं काम करत होता. संजय शेरपुरीया हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचा अत्यंत लाडका अधिकारी. या अधिकार्‍यानेही संरक्षण दलातील महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप झाला. पहेलगाममधल्या घटनेनंतर मध्यप्रदेशातून अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं. यातला एकजण हा भाजपचा कार्यकर्ता. जो आयटी सेलचा प्रमुख ध्रुव सक्सेना निघाला. तोही पाकिस्तानला माहिती पुरवायचा. पलकशेर मसिह आणि सुरज मसिह या दोघांना पंजाबमधून अटक झाली. हे दोघं पाकिस्तानला माहिती पुरवायचे. निशांत अगरवाल या अभियंत्याला झालेली अटक. सुरतगड चुरू येथील नितीन यादव आणि रामसिंह यांना हनीट्रॅपमध्ये झालेली कोठडी, ही सत्ताधारी पक्षाशी संबंधितांची जंत्री आहे. सतेंद्र सिवाल या भारतीय दुतावासात मल्टी टास्टिंग म्हणून काम करणार्‍या व्यक्तीला उत्तरप्रदेशच्या हापूडमधून तर लाभशंकर महेश्‍वरी याला तारापूर येथून अटक करण्यात आली. पहेलगामच्या हल्ल्याची माहिती असलेल्या अमित बिस्ट या आंध्रमधून आलेल्या अधिकार्‍याने संशयास्पद ठिकाणांवर तैनात असलेल्या 20 सैनिकांना अचानक बदलण्याच्या मागचं गणित गंभीरच होतं. हे बिस्ट संरक्षण संल्लागार अजित दोभाल यांच्या जवळचे अधिकारी असल्याने त्यांनाही पहेलगामच्या सुरक्षेवर कोणीही जाब विरायला तयार नाही. पुंछच्या गोळीबारात धारातीर्थी पडलेल्या कारी महंमद इक्बाल या सैनिकाला थेट जैश-ए-महंमदचा अतिरेकी ठरवून त्याची बदनामी करणारे वाहिन्यांचे आगलावे अँकर असोत की देशाची माहिती शत्रूना पुरवणारे हनीटॅपर असोत, या घरभेद्यांना ठेचल्याशिवाय देश सुधारणार नाही, हे मात्र नक्की.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 741
पहलगाम हल्ला प्रवीण पुरो भारत पाक संघर्ष भारत पाकिस्तान रविवार विशेष
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली…

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.