Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश; वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा!
धार्मिक

आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश; वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा!

30 जानेवारी 2025 रोजी त्यांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र देऊन या मागणीचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गालगत असलेले आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थान आता ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या देवस्थानाला हा मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

वेल्हाळे आणि परिसरातील भाविकांसाठी हरीबाबा देवस्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या मंदिर परिसरात विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, भौतिक सुविधांच्या अभावामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आमदार सत्यजित तांबे यांनी या समस्येची दखल घेत, जिल्हा नियोजन समितीकडे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

30 जानेवारी 2025 रोजी त्यांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र देऊन या मागणीचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. अहमदनगर येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला.

या निर्णयामुळे आता हरीबाबा मंदिर परिसरात सुशोभीकरण आणि भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. वेल्हाळे, हरीबाबा देवस्थान ट्रस्ट, सायखिंडी, मालदाड, घुलेवाडी, अमृतनगर, गुंजाळवाडी, चिकणी, राजापूर, क-हे, सुकेवाडी आणि परिसरातील नागरिकांनी आमदार सत्यजित तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले: “माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हरीबाबा देवस्थानचा विकास करणार आहोत. तालुक्यातील इतर देवस्थानांप्रमाणेच या देवस्थानाचाही पर्यटन विकास साधला जाईल. भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.”

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,031
सत्यजित तांबे हरीबाबा देवस्थान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

12/08/2026

श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळ गणेशोत्सवाची नूतन कार्यकारी कार्यकारिणी जाहीर; नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा आहे समावेश

10/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ किंवा जबाबदारीची पूर्तता…

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.