Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात अवैध धंद्यांचे थैमान; आमदार अमोल खताळ यांचा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज, मतदार संघातील महत्त्वाचे प्रश्न नियोजन समितीमध्ये…
बैठक

संगमनेरात अवैध धंद्यांचे थैमान; आमदार अमोल खताळ यांचा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज, मतदार संघातील महत्त्वाचे प्रश्न नियोजन समितीमध्ये…

वेल्हाळे येथील हरिबाबा देवस्थानाला 'क' वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती, ज्याला मान्यता मिळाली आहे. याबद्दल त्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांचे आभार मानले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/05/2025Updated:11/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि.११ मे: 

संगमनेर शहरात गौण खनिजांची चोरी, अवैध धंदे, मटका आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, पोलीस प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. त्यांच्या या मागणीमुळे संगमनेरातील अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली.

याच बैठकीत आमदार खताळ यांनी संगमनेर मतदारसंघातील विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याची माहिती आपल्या समाज माध्यमातून दिली आहे.

आमदार खताळ यांनी वेल्हाळे येथील हरिबाबा देवस्थानाला ‘क’ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती, ज्याला मान्यता मिळाली आहे. याबद्दल त्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांचे आभार मानले. यासोबतच, शाहीर विठ्ठल उमप आणि कवी अनंत फंदी यांच्या स्मारकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली, यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

https://www.facebook.com/share/p/16QrZxKNw1/

विश्वगुरु श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे १७ जून २०२५ रोजी पालखी मुक्कामी असणार आहे. या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय आणि निवारा यांसारख्या आवश्यक सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती आमदार खताळ यांनी केली, या अनुषंगाने प्रशासनाला योग्य निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठवताना आमदार खताळ यांनी पाणी आणि चारा टंचाई तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने वरिष्ठांना सादर करण्याची मागणी केली, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळू शकेल. तसेच, महादेव प्रणाली अंतर्गत पावसाचे मोजमाप करणारी यंत्रणा कार्यरत आहे का, याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

याव्यतिरिक्त, आमदार खताळ यांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागात टँकरची संख्या वाढवण्याची आणि टँकरमधील पाण्याची गुणवत्ता तपासण्याची मागणी केली. जमीन नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी गायरान जमिनीचा वापर करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची सूचना त्यांनी केली. नाशिक-पुणे महामार्ग प्रकल्पातील प्रलंबित भूमी अधिग्रहणाच्या मोबदल्याच्या फाईल्स तातडीने निकाली काढण्याची मागणीही त्यांनी केली. बंद पडलेली पर्जन्यमापक यंत्रे आणि धोकादायक विद्युत तारा दुरुस्त करण्यासाठी महावितरणला तातडीने सूचना देण्याची मागणी त्यांनी या बैठकीत केली.

या बैठकीला खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह नगर जिल्ह्यातील आमदार व विविध विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. संगमनेरातील अवैध धंद्यांसारख्या गंभीर विषयावर आमदारांनी पुन्हा एकदा थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवल्यामुळे आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,629
अमोल खताळ जिल्हा नियोजन समिती बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या…

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.