Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पाणीपुरवठा निविदा गैरव्यवहार: अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी, दोन महिन्यांत कारवाईची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची घोषणा
राजकारण

संगमनेर पाणीपुरवठा निविदा गैरव्यवहार: अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी, दोन महिन्यांत कारवाईची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची घोषणा

वाढीव दर ३२ टक्के असल्याचे नमूद असले, तरी संपूर्ण निविदा प्रक्रियेत अनेक गंभीर अनियमितता आणि त्रुटी आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई:
संगमनेर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेची नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि दोन महिन्यांत दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली. आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खताळ यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे या गंभीर प्रकरणावर सभागृहात जोरदार आवाज उठवला होता.
आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, जून २००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पाणीपुरवठा योजनेच्या निविदेला तब्बल ६९ टक्के वाढीव दराने मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढीव दराने निविदा मंजूर होण्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे. या प्रक्रियेला तत्कालीन सात नगरसेवकांनी तीव्र विरोध केला असतानाही, तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्षा शोभा पुंड, पाणीपुरवठा सभापती लाला बेपारी आणि तत्कालीन मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी नियमबाह्य पद्धतीने संबंधित ठेकेदार व माजी जिल्हा परिषद सदस्य आर. एम. कातोरे यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी संगनमत केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या गैरव्यवहारामुळे नगरपरिषदेला मोठा आर्थिक फटका बसला असून, दोषींवर थेट आणि कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले की, निविदा प्रक्रियेदरम्यानच संचालनालयाने (डीएमए) या ६९ टक्के वाढीव दराची गंभीर दखल घेत चौकशीचे निर्देश दिले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अहवालात हा वाढीव दर ३२ टक्के असल्याचे नमूद असले, तरी संपूर्ण निविदा प्रक्रियेत अनेक गंभीर अनियमितता आणि त्रुटी आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बाबींची दखल घेऊनच सरकारने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी समिती पुढील दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार असून, या अहवालाच्या आधारे दोषी आढळणाऱ्या तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी विधानसभेत दिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 555
अमोल खताळ माधुरी मिसाळ संगमनेर नगर परिषद पाणीपुरवठा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.