
संगमनेर – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांचा वेल्हाळे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
नाशिक-पुणे महामार्गालगत असलेले हरीबाबा देवस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या कार्याबद्दल वेल्हाळे ग्रामस्थांनी आमदार तांबे यांचा संगमनेर येथे सत्कार केला.

हरीबाबा देवस्थान हे वेल्हाळे परिसरातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. कारखाना, मालदाड, साईखिंडी, गुंजाळवाडी, चिकणी आदी परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. यापूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मंदिर परिसरात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन या देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे ३० जानेवारी २०२५ रोजी पत्र देऊन मागणी केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या मागणीला मान्यता मिळाली.
देवस्थानचे अध्यक्ष गोविंद नाना जेडगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार तांबे यांची भेट घेतली. या वेळी उपाध्यक्ष संपत गणपत वामन, सचिव शंकर कोंडाजी गुळवे, विश्वस्त संतोष जगन्नाथ भांड, ज्ञानदेव सुखदेव वामन, सचिन भास्कर गुळवे, तानाजी सतु शिरतार (युवक काँग्रेस अध्यक्ष), मंगेश कांडेकर, विलास नवले, सुधीर नवले, गोरख सदाशिव शिरतार, सोमनाथ हरिभाऊ सोनवणे, गोरख लक्ष्मण सोनवणे, विष्णू संपत आव्हाड (सरपंच), सिताराम म्हसु गुळवे (उपसरपंच), सुनील जाधव, महाकाल महाराज, निवृत्ती खरात आदी उपस्थित होते.
हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांचे हरीबाबा देवस्थान ट्रस्ट, सायखिंडी, मालदाड, घुलेवाडी, अमृतनगर, गुंजाळवाडी, चिकणी, राजापूर आदी गावांतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.


