Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुलाबाचे फूल अन् हाती नवे पुस्तक; अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत!

June 15, 2026

आज सोमवार, १५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 15, 2026

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

June 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजीत तांबे यांची विधानमंडळाच्या लोकलेखा समितीवर निवड
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांची विधानमंडळाच्या लोकलेखा समितीवर निवड

स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या परंपरेचा वारसा जपत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजीत तांबे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि युवा विकासाला प्राधान्य दिले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 14, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या लोकलेखा समितीवर (Public Accounts Committee) आमदार सत्यजीत तांबे यांची निवड झाली आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, प्रभावी मांडणी आणि युवा नेतृत्वामुळे ही निवड विशेष लक्षवेधी ठरली आहे.

विधानमंडळ सचिवालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, आमदार तांबे यांची लोकलेखा समितीवर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती राज्य सरकारच्या खर्चावर, आर्थिक निर्णयांवर आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालावर आधारित चौकशी करून शिफारसी करते. विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

युवा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तांबे यांच्यावर राज्याच्या आर्थिक पारदर्शकतेची मोठी जबाबदारी आली आहे. त्यांनी यापूर्वी विधान परिषदेत कायदा, आरोग्य, शिक्षण, शेती, पदवीधरांचे प्रश्न, विनाअनुदानित संस्था आणि डॉक्टर, वकील, इंजिनीअर यांच्याशी संबंधित अनेक मुद्दे अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी पाच जिल्ह्यांतील ५४ तालुक्यांमध्ये प्रभावी काम करून मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांची ही निवड त्यांच्या जनसंपर्क, सर्वसामान्यांशी बांधिलकी आणि विधिमंडळातील सक्रिय सहभागाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या परंपरेचा वारसा जपत, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजीत तांबे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि युवा विकासाला प्राधान्य दिले. त्यांचे नेतृत्व, प्रभावी संवाद कौशल्य आणि सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

सत्यजीत तांबे यांची लोकलेखा समितीवर झालेली निवड त्यांच्या कार्यक्षमतेचा गौरव आहे आणि महाराष्ट्रातील युवा नेतृत्वाला मिळालेली मोठी संधी आहे. त्यांच्या निवडीचे उत्तर महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,746
लोकलेखा समिती सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

गुलाबाचे फूल अन् हाती नवे पुस्तक; अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत!

By अनंत पांगारकरJune 15, 20260

मोहसीन शेख, संगमनेर नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अँग्लो उर्दू हायस्कूल, संगमनेर येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात…

आज सोमवार, १५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 15, 2026

अपुऱ्या पावसामुळे पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आवाहन; ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी निश्चित करण्याचे मंत्री विखे पाटलांचे निर्देश

June 14, 2026

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.