Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील विट व्यवसायाला अवकाळी पावसाचा मोठा फटका; विमा संरक्षणाची मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर तालुक्यातील विट व्यवसायाला अवकाळी पावसाचा मोठा फटका; विमा संरक्षणाची मागणी

या गंभीर परिस्थितीमुळे संगमनेर तालुक्यातील विट व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने तातडीने यावर विचार करून योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार करण्यासाठी ठेवलेल्या कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विट उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विट उत्पादकांनी शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी केली आहे, परंतु शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही.
शेतमालाला अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास जशी विमा योजना लागू आहे, त्याच धर्तीवर विट व्यवसायासाठी देखील विमा योजना लागू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विट उत्पादकांनी विमा कंपन्यांकडे विमा पॉलिसीनुसार कच्च्या विटांचा विमा उतरवण्याची विचारणा केली असता, विमा कंपन्यांनी मात्र विट व्यवसायासाठी त्यांच्याकडे कोणतेही विशिष्ट धोरण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लाखो कामगार आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला हा व्यवसाय नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कोणत्याही सुरक्षा कवचाविना राहतो, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असे विट उत्पादकांचे म्हणणे आहे.
राज्य सरकार कुंभार समाजाला मातीवरील रॉयल्टी माफ करते, परंतु मार्च एंडला विट व्यावसायिकांकडून सक्तीने वसुली करते. त्यामुळे आमच्या मागण्यांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून विट उत्पादकांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी कुंभार समाज विट उत्पादक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे संगमनेर तालुक्यातील विट व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने तातडीने यावर विचार करून योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 633
वीट व्यावसायिक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.