Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत मुंबईतील व्यापाऱ्याचे साडेतीन किलो सोने आणि ४ लाखांची रोकड लंपास, चालकावर संशय
गुन्हेगारी

शिर्डीत मुंबईतील व्यापाऱ्याचे साडेतीन किलो सोने आणि ४ लाखांची रोकड लंपास, चालकावर संशय

खिशी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चालक सुरेश कुमार दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे कामाला होता आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. सुरेश कुमार चोरी करून मोबाईल आणि कपडे खोलीतच ठेवून फरार झाला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी: मुंबईतील सोने व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी यांना शिर्डीत मोठा गंडा घालण्यात आला आहे. त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपये किंमतीचे सुमारे साडेतीन किलो सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. या प्रकरणी खिशी यांनी त्यांचा चालक सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याच्यावर संशय व्यक्त केला असून शिर्डी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विजयसिंह खिशी हे मुंबईतील त्यांच्या फर्ममधून सोन्याचे दागिने घेऊन ७ मे रोजी शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार होते. त्यांनी हॉटेल साई सुनीतामध्ये खोली क्रमांक २०१ मध्ये मुक्काम केला होता. खिशी हे परिसरातील सराफा दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी जात असत आणि रात्री हॉटेलमध्ये परत येत.

१३ मे रोजी रात्री जेवणानंतर खिशी त्यांच्या खोलीत झोपले होते. सोन्याच्या दागिन्यांची बॅग बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवलेली होती आणि खोली आतून बंद होती. मालक आणि दोन्ही कामगार एकाच खोलीत होते.

दुसऱ्या दिवशी, १४ मे रोजी सकाळी ६ वाजता खिशी यांचे चुलत भाऊ शैलेंद्रसिंह पेमेंट घेण्यासाठी हॉटेलवर आले. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला असता तो उघडा होता आणि चालक सुरेश कुमार खोलीत नव्हता. त्याचे कपडे आणि मोबाईल खोलीतच होते. हॉटेल आणि परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर खिशी यांनी बॅग तपासली असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.

खिशी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चालक सुरेश कुमार दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे कामाला होता आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. सुरेश कुमार चोरी करून मोबाईल आणि कपडे खोलीतच ठेवून फरार झाला आहे.

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाच्या तपासासाठी शिर्डीत दाखल झाले असून त्यांनी हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. चालक सुरेश कुमारने ही चोरी एकट्याने केली आहे की त्याच्यामागे आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,322
दागिने चोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील प्रवाशांच्या सुविधेसाठी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी…

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.