Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये प्रशासनाची धडक कारवाई: ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची सुटका; ठेकेदारावर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये प्रशासनाची धडक कारवाई: ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची सुटका; ठेकेदारावर गुन्हा दाखल

या प्रकरणी ठेकेदार राठोड याच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ (ॲट्रॉसिटी कायदा) आणि वेठबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम, १९७६ च्या संबंधित कलमांनुसार गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर आणि कर्जुले पठार भागातील दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने आज (गुरुवारी) यशस्वीरित्या सुटका केली. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सकाळी मिळालेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने आणि प्रभावीपणे ही कारवाई केली. मुक्त करण्यात आलेल्या ३८ वेठबिगार कामगारांमध्ये २२ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित ठेकेदारावर घारगाव पोलीस ठाण्यात वेठबिगार प्रतिबंधक कायद्यासह कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, संगमनेरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक या कारवाईसाठी नेमण्यात आले होते. या पथकात सरकारी कामगार अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. सुमारे १० ते १२ सदस्यांच्या तीन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी या दगडखाणींवर धडक कारवाई केली आणि वेठबिगार तसेच बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

मुक्त करण्यात आलेले सर्व वेठबिगार आणि बालकामगार हे पालघर जिल्ह्यातील आहेत. प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत तहसीलदारांच्या स्वाक्षरीने त्यांना बंधमुक्तता प्रमाणपत्र प्रदान केले. यानंतर, पोलीस संरक्षणात या सर्वांना त्यांच्या मूळ गावी, पालघर येथे रवाना करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान मुक्त केलेल्या स्त्री, पुरुष आणि बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यानंतर, संगमनेर प्रशासनाच्यावतीने त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ठेकेदार राठोड याच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ (ॲट्रॉसिटी कायदा) आणि वेठबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम, १९७६ च्या संबंधित कलमांनुसार गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 4,045
कारवाई कुणाल सोनवणे धीरज मांजरे पंकज आशिया बालकामगार माणिक आहेर वेठबिगार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली गेली…

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.