Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भूखंड दुरुस्तीसाठी तीन लाखांची लाच; अपर तहसीलदार आणि दोन खासगी व्यक्ती जाळ्यात
गुन्हेगारी

भूखंड दुरुस्तीसाठी तीन लाखांची लाच; अपर तहसीलदार आणि दोन खासगी व्यक्ती जाळ्यात

सापळा अधिकारी वाल्मीक कोरे आणि सहायक सापळा अधिकारी गोरखनाथ गांगुर्डे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

छत्रपती संभाजीनगर: जमिनीच्या नोंदीतील दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या अपर तहसीलदारासह दोन खासगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेड्या ठोकल्या आहेत.

अपर तहसीलदार नितीन गर्जे (वय ४५) आणि त्यांचे कथित मध्यस्थ नितीन धुमा चव्हाण (वय ३८) व सोहेल जुबेर बहाशवान (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका ५० वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती.

एसीबीचे सापळा अधिकारी वाल्मिक कोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलाच्या आणि नातेवाईकांच्या मालकीच्या मिटमिटा येथील भूखंडाच्या क्षेत्र दुरुस्तीसंबंधी पाच प्रकरणे डिसेंबर २०२४ पासून अपर तहसीलदार कार्यालयात प्रलंबित होती. तक्रारदार एप्रिल २०२५ मध्ये सुनावणीसाठी हजर झाले असता, निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी अपर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती नितीन चव्हाण याने लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १३ मे रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी १४ मे रोजी करण्यात आली. त्यावेळी शासकीय पंचांसमक्ष तक्रारदाराने अपर तहसीलदार नितीन गर्जे आणि नितीन चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत गर्जे यांनी चव्हाण याला लाच मागण्यास प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक फाईलसाठी ६० हजार रुपये याप्रमाणे एकूण तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

१५ मे रोजी एसीबीने सापळ्याची योजना आखली. त्यानुसार, तक्रारदाराने लाचेची रक्कम नितीन चव्हाण याच्या सांगण्यावरून परिसरातील पार्किंगचे काम पाहणाऱ्या सोहेल बहाशवान याच्याकडे सुपूर्द केली. इशारा मिळताच एसीबीच्या पथकाने बहाशवान याला रंगेहाथ पकडले.

या कारवाईनंतर आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली. नितीन चव्हाण याच्या अंगझडतीत एक आयफोन, नोकियाचा मोबाईल आणि ७५ हजार रुपये रोख रक्कम मिळाली, तर सोहेल बहाशवान याच्याकडून मोबाईल फोन आणि ६० हजार रुपये जप्त करण्यात आले. सापळा अधिकारी वाल्मीक कोरे आणि सहायक सापळा अधिकारी गोरखनाथ गांगुर्डे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 876
लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर फेस्टिव्हलमधील दुसरा दिवस गाजवला तो विख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्या…

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.