Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घुलेवाडीत विकास कामांच्या शुभारंभावरून श्रेयवादाची लढाई पेटली! थोरातांच्या निधीवर नव्या लोकप्रतिनिधींचा डोळा?
राजकारण

घुलेवाडीत विकास कामांच्या शुभारंभावरून श्रेयवादाची लढाई पेटली! थोरातांच्या निधीवर नव्या लोकप्रतिनिधींचा डोळा?

नव्या लोकप्रतिनिधींनी एक रुपयाचाही नवीन निधी आणलेला नाही. केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी जुन्या कामांचे उद्घाटन केले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

घुलेवाडीतील विकासकामांच्या श्रेयवादावरून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या कामांचा शुभारंभ नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केल्याने गावात तीव्र नाराजी पसरली आहे. एक रुपयाचाही नवीन निधी न आणता थोरातांच्या कामांवर हक्क सांगणे योग्य नाही, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी केला आहे. यामुळे घुलेवाडीत राजकीय वादंग पेटले आहे.

काय आहे नेमके प्रकरण – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडीसाठी 2024-25 या आर्थिक वर्षात विविध विकासकामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. या निधीतून गावठाणातील पेव्हिंग ब्लॉक बसवणे, रस्ते काँक्रिटीकरण, बंदिस्त गटार, रस्ते डांबरीकरण, म्हसोबानगरातील विकासकामे, वीजपुरवठा आणि रस्ते मजबुतीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी या कामांचे उद्घाटन केल्याने वाद निर्माण झाला आहे.

घुलेवाडीतील नागरिकांमध्ये या घटनेमुळे तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामस्थ आणि महिलांनी निषेध व्यक्त केला असून, थोरातांनी दिलेल्या निधीवर दुसऱ्यांनी हक्क सांगणे योग्य नाही, यापुढे जुन्या कामांचे उद्घाटन केल्यास संपूर्ण गाव विरोध करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे घुलेवाडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

थोरातांच्या कामांवर डोळा? – सीताराम राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासकामे झाली आहेत. घुलेवाडीतील कामांसाठी त्यांनीच निधी मंजूर केला होता. नव्या लोकप्रतिनिधींनी एक रुपयाचाही नवीन निधी आणलेला नाही. केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी जुन्या कामांचे उद्घाटन केले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.

सरपंचांचाही संताप – घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत यांनीही नव्या लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. “थोरातांनीच गावासाठी निधी दिला आहे. आजही अडचणी आल्यास ग्रामस्थ त्यांच्याकडेच जातात. नव्या लोकप्रतिनिधींना याबाबत काहीही माहिती नाही. त्यांनी नवीन निधी आणावा आणि मगच उद्घाटन करावे,” असे त्यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,691
घुलेवाडी बाळासाहेब थोरात विकास कामे भूमिपूजन सिताराम राऊत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर फेस्टिव्हलमधील दुसरा दिवस गाजवला तो विख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्या…

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.