Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचे गांजा तस्कर सिन्नरमध्ये जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

संगमनेरचे गांजा तस्कर सिन्नरमध्ये जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

संगमनेरमधून राज्याच्या अनेक भागात अशा प्रकारे गांजा विकला जात असल्याची चर्चा सातत्याने होत असते, अनेकदा बाहेरील पोलीस कारवाई देखील करत असतात. मात्र संगमनेर पोलीस अथवा अहिल्यानगरच्या एलसीबीने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसत नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर/सिन्नर –
संगमनेरमधील दोन गांजा तस्करांना सिन्नर पोलिसांनी मोठ्या कारवाईत अटक केली आहे. हे आरोपी अवैधरित्या गांजाची वाहतूक करत असताना सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ किलो २० ग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली होंडा सिव्हिक कार असा एकूण ८ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे संगमनेर आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १६ मे रोजी नाशिक-पुणे महामार्गावरील हॉटेल न्यू वैष्णवीसमोर पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात सिल्व्हर रंगाची होंडा सिव्हिक कार (क्रमांक एम. एच. ०१/ई.सी. ५७४८) अडवण्यात आली. गाडीची तपासणी केली असता, त्यात ४ किलो २० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ गाडीतील प्रथमेश पोपट राऊत (वय २५, रा. घुलेवाडी, संगमनेर) आणि शिवाजी गोरख सातपुते (वय २७, रा. साईनगर, नेहरू चौक, संगमनेर) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत ८२ हजार रुपये असून, होंडा सिव्हिक कारची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये आहे. आरोपी हे अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक हर्षल भोळे, दत्ता कांभीरे, नवनाथ सानप, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, समाधान बोराडे, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, इम्रान पटेल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, शरद मोगल, तानाजी झुरडे, योगिता काकड आणि अस्मिता मढवई यांचा समावेश होता.
संगमनेरमधील आरोपी सिन्नरमध्ये गांजासह पकडले गेल्याने, आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अधिक तपास करण्याची शक्यता आहे. या तस्करांचे आणखी साथीदार आहेत का आणि ते कोणाला गांजा पुरवठा करत होते, याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेमुळे संगमनेरमधील अवैध धंद्यांचे कनेक्शन संगमनेरबाहेर देखील असल्याचे स्पष्ट झाले आहे. संगमनेरमधून राज्याच्या अनेक भागात अशा प्रकारे गांजा विकला जात असल्याची चर्चा सातत्याने होत असते, अनेकदा बाहेरील पोलीस कारवाई देखील करत असतात. मात्र संगमनेर पोलीस अथवा अहिल्यानगरच्या एलसीबीने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसत नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,707
गांजा विक्री नाशिक पोलीस कारवाई पोलीस कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर फेस्टिव्हलमधील दुसरा दिवस गाजवला तो विख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्या…

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.