Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अडीच कोटींचे सोन्याचे दागिने जप्त, आरोपी अद्याप फरार
गुन्हेगारी

अडीच कोटींचे सोन्याचे दागिने जप्त, आरोपी अद्याप फरार

जप्त केलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून, पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी: 

शिर्डीतून चोरी झालेल्या २ कोटी ५० लाख ५९ हजार १०३ रुपये किमतीचे, २ किलो ६८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.

गुजरात राज्यातील बनासकाटा येथील सोने व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (वय ३५) हे होलसेल सोन्याचा व्यवसाय करतात. १३ मे २०२५ रोजी ते आपला ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (रा. चौहटन, जि. बारमेर, राजस्थान) याच्यासोबत शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी होते. याच रात्री ड्रायव्हरने ३ कोटी २६ लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे निर्देश दिले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अरुण गांगुर्डे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड आणि चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने तपास सुरू केला.

पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा पुणे आणि मुंबईत शोध घेतला. आरोपी मूळ गावी राजस्थानमधील इब्रे का ताला, ता. चोहटन, जि. बारमेर येथे गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने तेथे धाव घेतली. मात्र, आरोपी सुरेशकुमार राजपुरोहित हाती लागला नाही.

पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगितले. २३ मे रोजी आरोपीचा भाऊ रमेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (वय ३३) स्थानिक गुन्हे शाखेत हजर झाला आणि त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असल्याची माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेशकुमारने २१ मे रोजी शिर्डीतून चोरलेले सोन्याचे दागिने बॅगेतून घरी आणून ठेवले होते आणि त्यानंतर तो कुठेतरी निघून गेला.

रमेशकुमार राजपुरोहित याने हजर केलेले २ कोटी ५० लाख ५९ हजार १०३ रुपये किमतीचे, २ किलो ६८७.३६१ ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने (एसएनपी नग, टॉप्स, डुल, बाळी, मंगळसूत्र वाट्या, लेडीज रिंग, राजमुद्रा रिंग) जप्त करण्यात आले. जप्त केलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून, पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 742
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर फेस्टिव्हलमधील दुसरा दिवस गाजवला तो विख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्या…

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.