Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय: या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळणार!
शेती व सहकार

राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय: या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळणार!

या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन परत मिळणार आहे. यामुळे त्यांना पुन्हा शेती सुरू करून आपले जीवनमान उंचावण्याची संधी मिळेल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई

राज्य सरकारने शेतसारा न भरल्यामुळे सरकारच्या ताब्यात गेलेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा अध्यादेश अखेर जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, अंदाजे ५ हजार एकर जमिनींचा मार्ग मोकळा झाला आहे.
निर्णयाची पार्श्वभूमी… सध्या राज्यात सुमारे ५ हजार एकर आकारीपड जमिनी आहेत, त्यापैकी एकट्या पुणे विभागात ५९७ एकर जमीन आहे. मार्च महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या जमिनी मूळ शेतकरी, मालक किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अध्यादेश प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळत नव्हता आणि काही ठिकाणी वादही निर्माण झाले होते. अखेर तीन महिन्यांनी हा अध्यादेश जाहीर झाल्याने आता या निर्णयाची अंमलबजावणी शक्य होणार आहे.
आकारीपड जमीन म्हणजे काय?… शेतमालकांनी वेळेवर शेतसारा, तगाई किंवा कर्ज न भरल्यामुळे ज्या जमिनी सरकारी ताब्यात गेल्या होत्या, परंतु प्रत्यक्षात त्या मूळ शेतकऱ्यांकडेच होत्या आणि सातबारा उताऱ्यावर सरकारी मालकी दाखवली जात होती, अशा जमिनींना ‘आकारीपड’ जमीन म्हणतात.
जमिनी परत मिळवण्यासाठी अटी व नियम… राज्य सरकारने या जमिनी परत देण्यासाठी काही अटी आणि नियम ठरवले आहेत:
* जमिनीच्या प्रचलित बाजारमूल्याच्या ५% शुल्क घेऊन ती परत दिली जाईल.
* ही जमीन वर्ग २ भोगवटादार म्हणून नोंदवली जाईल.
* १० वर्षांपर्यंत तिचे हस्तांतरण करता येणार नाही.
* १० वर्षांनंतर सरकारच्या पूर्वमान्यतेने ती वर्ग १ मध्ये रूपांतरित करता येईल.
* ही जमीन शेतीसाठी दिली जात असल्याने, पहिल्या ५ वर्षांत तिचा बिगरशेती वापर करता येणार नाही.
या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन परत मिळणार आहे. यामुळे त्यांना पुन्हा शेती सुरू करून आपले जीवनमान उंचावण्याची संधी मिळेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 791
आकारीपड जमीन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.