Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा
शेती व सहकार

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा

जिल्ह्यात रखडलेल्या प्रकरणांचा आढावा घेतला असता, सर्वाधिक २९ प्रलंबित प्रकरणांसह ५८ लाख रुपयांचा निधी पारनेर तालुक्यात अडकला आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यात २४ प्रकरणांचे ४८ लाख रुपये रखडले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:
शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ला प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. ऑनलाइन पारदर्शकतेचा दावा केला जात असला तरी, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १३४ मदत प्रकरणे प्रलंबित राहिली असून, अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबे २ कोटी ६५ लाख रुपयांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या सलग दोन वर्षांत एकही प्रस्ताव प्रलंबित नसताना, यंदा मात्र निधीअभावी लाभार्थींना ताटकळत राहावे लागत आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, सन २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातून एकूण ३९० प्रस्ताव दाखल झाले होते. यामध्ये शेतीकामा दरम्यान झालेले अपघात, वीज पडणे, सर्पदंश, पूर आणि रस्ते अपघात अशा विविध कारणांमुळे झालेल्या ३८४ मृत्यूंच्या आणि ६ अपंगत्वाच्या प्रकरणांचा समावेश होता. या प्रस्तावांची छाननी करून प्रशासनाने ३५० प्रस्तावांना मंजुरी दिली.
यामध्ये ३४४ मृत शेतकरी आणि ६ अपंग शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा समावेश आहे. या मंजूर प्रस्तावांसाठी एकूण ६ कोटी ९४ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती, मात्र शासनाकडून केवळ ४ कोटी २९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने तेवढ्याच रकमेचे वितरण करण्यात आले. उर्वरित प्रकरणांसाठी अजूनही निधीची प्रतीक्षा आहे.
शासन स्तरावर या योजनेचे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ऑनलाइन करण्यात आली आहे. कागदपत्रांची तपासणी आणि मंजुरी डिजिटल पद्धतीने झाल्यामुळे प्रकरणांचा निपटारा जलद होईल, असा दावा केला जात होता. परंतु, मंजुरीची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी अनुदानाचे वितरण मात्र अजूनही ऑफलाइन पद्धतीनेच केले जात असल्याने निधी वाटपात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ऐन अडचणीच्या काळात हक्काची मदत वेळेवर मिळत नसल्याने, अपघातानंतर उत्पन्नाचे साधन गमावलेल्या शेतकरी कुटुंबांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात रखडलेल्या प्रकरणांचा आढावा घेतला असता, सर्वाधिक २९ प्रलंबित प्रकरणांसह ५८ लाख रुपयांचा निधी पारनेर तालुक्यात अडकला आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यात २४ प्रकरणांचे ४८ लाख रुपये रखडले आहेत.
इतर तालुक्यांचा विचार केल्यास अहिल्यानगर तालुक्यात १३ प्रकरणांचे २६ लाख, कर्जतमध्ये १३ प्रकरणांचे २६ लाख, राहुरीमध्ये ११ प्रकरणांचे २० लाख, कोपरगावमध्ये ११ प्रकरणांचे २२ लाख आणि राहाता तालुक्यात ११ प्रकरणांचे २२ लाख रुपये प्रलंबित आहेत.
तसेच पाथर्डी आणि श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येकी ६ प्रकरणांचे १२-१२ लाख, अकोले तालुक्यात ४ प्रकरणांचे ८ लाख, श्रीरामपूरमध्ये ३ प्रकरणांचे ६ लाख आणि नेवासा तालुक्यात ३ प्रकरणांचे ५ लाख रुपये थकले आहेत. अपघाताच्या आघातातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कुटुंबांना सरकारने तातडीने निधी वर्ग करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 154
अनुदान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.