Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार क्षेत्रात आदर्श: थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर ५० किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
शेती व सहकार

सहकार क्षेत्रात आदर्श: थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर ५० किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

दूध संघाने आपल्या परिसरात १ हजार ३३५ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला असून अशा प्रकल्पांमुळे वाचणाऱ्या वीज खर्चाचा थेट फायदा अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनाच मिळतो
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

संपूर्ण देशातील सहकार क्षेत्रासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने तंत्रज्ञानाची कास धरत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कारखान्याच्या नूतन व अद्यावत अशा भव्य प्रशासकीय इमारतीच्या छतावर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून, याचे भव्य लोकार्पण नुकतेच झाले. विजेची वाढती मागणी आणि निर्माण होणारा तुटवडा पाहता, भविष्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे ही काळाची गरज बनली असून थोरात कारखान्याचा हा प्रकल्प इतर कारखान्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

या विशेष लोकार्पण सोहळ्याला कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, किशोर देशमुख आणि दिगंबर मुळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने पुढील ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन केले आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून कारखान्याने ५ हजार ५०० मेट्रिक टन गाळप क्षमता आणि ३० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प यापूर्वीच यशस्वीपणे कार्यान्वित केला आहे, तो राज्याच्या सहकार क्षेत्रासाठी एक आदर्श मानला जातो. कारखान्याने नेहमीच सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगार यांनी हिताला प्राधान्य देत तालुक्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात मोठे योगदान दिले आहे.

कारखान्याने नव्याने उभारलेली प्रशासकीय इमारत अत्यंत आधुनिक आहे. आता या इमारतीवर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी लागणारी दैनंदिन वीज याच प्रकल्पातून उपलब्ध होणार आहे. यामुळे पारंपरिक विजेची मोठी बचत होऊन कारखान्याचा प्रशासकीय खर्च कमी होणार आहे.

या संदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचेही कौतुक केले. दूध संघाने आपल्या परिसरात १ हजार ३३५ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला असून अशा प्रकल्पांमुळे वाचणाऱ्या वीज खर्चाचा थेट फायदा अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांनाच मिळतो, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविकातून प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली, तर शेवटी व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 383
थोरात कारखाना बाळासाहेब थोरात सौर ऊर्जा प्रकल्प
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

04/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

01/08/2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

30/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: एका दुःखद प्रसंगासाठी एकत्र आलेल्या नातेवाईकांवर नियतीने आणखी एक भीषण…

५२ हजार रुपयांच्या अवैध अग्निशस्त्रासह युवक जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.