Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पावसाच्या पाण्याच्या डबक्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र संवाद विशेष

पावसाच्या पाण्याच्या डबक्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – 

अहिल्यानगर जिल्ह्यातील चास तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराजवळ साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

अमितेश बलराज बिडे (वय १०) आणि अनिकेत बलराज बिडे (वय ०६, रा. चास, ता. अहिल्यानगर) अशी मयत भावंडांची नावे आहेत. या घटनेने चास परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अमितेश आणि अनिकेत हे दोघे भाऊ त्यांच्या घराजवळ खेळत असताना पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या एका डबक्यात पडले. ही बाब लक्षात येताच, त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघेही बेशुद्ध झाले होते.

त्यांचे चुलते जयसिंग बिडे यांनी तातडीने दोघांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,296
पाण्यात बुडून मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.