Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लालतारा परिसरातील घाणीचा प्रश्न ऐरणीवर: नागरिक संतप्त, प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप
सामाजिक

लालतारा परिसरातील घाणीचा प्रश्न ऐरणीवर: नागरिक संतप्त, प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप

परिसरातील या वाढत्या अस्वच्छतेमुळे लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले असून, साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये वाढली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, २९ मे २०२५

संगमनेर शहरातील लालतारा परिसरातील नागरिकांना सध्या वाढत्या अस्वच्छतेमुळे गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कचऱ्याचे ढिगारे, मृत जनावरांची कातडी आणि सर्वत्र पसरलेली घाण यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नावर नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लालतारा परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक भागांतील कचरा आणि विशेषतः मृत जनावरांची कातडी सर्रास लालतारा परिसरात आणून टाकली जाते. यामुळे या भागाला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी या समस्येबद्दल तक्रार केली आहे, पण आमच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, असे एका संतप्त नागरिकाने सांगितले. या घाणीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. आमचे आरोग्य धोक्यात आले आहे,” अशी व्यथा त्यांनी मांडली.

परिसरातील या वाढत्या अस्वच्छतेमुळे लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले असून, साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये वाढली आहे.

स्थानिक नागरिकांनी आता नगरपालिका प्रशासनाकडे तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कचरा आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा कार्यान्वित करावी, परिसराची नियमित स्वच्छता करावी आणि आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. जर यावर त्वरित कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 756
दुर्गंधी समस्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  विशेष प्रतिनिधी / मुंबई: मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची शिस्त आणि…

‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ जाण्यासाठी प्रत्येक कृतीत ईश्वरभाव जागवा: डॉ. संजय मालपाणी

25/08/2026

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.